मिरज, ८ फेब्रुवारी/ वार्ताहर तेलातील भेसळ रोखण्यासाठी रॉकेल-डिझेलचे समान दर करण्याचा शासनाचा विचार असून, दारिद्रय़रेषेखालील कुटुंबासाठी सध्याच्या दरात रॉकेल उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात डिझेल-पेट्रोल व रॉकेल दरांत प्रचंड तफावत असल्याने भेसळ वाढली आहे. यातूनच तेलमाफिया फोफावत आहेत. या दरातील तफावत संपुष्टात आणली तर आपोआपच भेसळ बंद होईल. रेशनवर मिळणारे रॉकेल डिझेलच्या दरात देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र दरातील तफावत अनुदानाच्या स्वरूपात रोखीने देण्याचा विचार सुरू आहे. शासनाने २५० तेलमाफियांना अटक केली असून, ही मोहीम सुरू राहील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (आजच्या 9 फेबु्वारी 2011 च्या 'लोकसत्ते'तील पान क्र. 12 वरील बातमी ) |
Wednesday, February 9, 2011
भेसळ रोखण्यासाठी रॉकेल-डिझेलचे दर समान करण्याचा विचार-मुख्यमंत्री
Labels:
रेशन/अन्न
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment