Monday, May 9, 2011

Invest in your own citizenship

iconimg
Vinita Singh, Hindustan Times
May 08, 2011

One thing is clear from Anna Hazare’s campaign against corruption — the people in this country are desperately seeking honest and upright leaders. The outpouring of support from all over the nation is a real demonstration of this need.

And while it is the right thing to do — support a cause and follow the one who leads it — this entire episode has raised some very important questions on the quality of citizenship we hold. We appear to be very happy being led — sometimes by bad men and sometimes by good men. But always led. Not questioning, not investing time in understanding what exactly the leaders are asking us to do. A case in point is this campaign against corruption.

While everyone instinctively responded to the demand to weed out corruption, very few people who were out on the streets had read the Jan Lokpal Bill being proposed by the campaign leaders. Further, as time went on, very few people were ready to listen to any arguments against the proposed Bill. If you are against the bill, you are with corruption and therefore unpatriotic.

How is this different from any other time that masses of us have been led by our leaders to speak their minds and not ours? When will the Indian citizen really find his own mind and speak it?

But this requires investing time and effort in our own citizenship. One step towards this is to understand our citizenship contract — the Constitution.

This is the most essential document determining our rights and responsibilities. It is also the document that determines the basis on which laws can be made and enforced. It sets out the scope and functions of the State.

For us to critically evaluate the Jan Lokpal Bill or any other proposal for law, we will need to understand the standard on which it will be tested. Without this understanding, we are just a chorus of excited voices. But once we have this knowledge, we can realise our power and stand up and be counted.

Another step is to get engaged and take action on issues of public concern. The RTI Act has made it possible for us to get information from any public authority. Filing complaints and petitions are ways of making our grievances and opinions heard. Look around you — poor sanitation, potholes, laws being broken. Small issue, big issue, any issue that you feel concerned about — be informed and take action.

And finally, reflect on the beliefs you hold as a citizen. Some of these beliefs are — I don’t matter, One person can’t make a difference, I am not responsible, Nothing will change. These are not beliefs that serve nation-building. And many of these beliefs simply do not hold water. Each citizen does matter and there is a deep connect between what you do and the system of governance.

Your own acts of breaking the law and bribing have added to the cumulative decay of the entire system. But the flip side of this is that every act of yours to own up and strengthen the system will add to the generative and renewal process.

In this context, it is important to recall the preamble of the Constitution which sets out the co-ownership of all people of this country. It starts with “We, the people of India…..” and ends with “hereby adopt, enact and give to ourselves this Constitution.” These are powerful words — fixing ownership and responsibility of liberty, equality and justice on each citizen. Not on the leaders — political or otherwise — but on every citizen. It is also important at this time to recall the words of Ambedkar in his last speech in the Constituent Assembly in 1949. He cautioned all Indian citizens not to “lay their liberties at the feet of even a great man, or to trust him with powers that enable him to subvert their institutions”.

(Vinita Singh works with We, The People, a citizens’ rights network)

Friday, April 29, 2011

सोनिया गांधींचे अण्‍णा हजारेंना पत्र

सोनिया गांधी

अध्‍यक्ष

राष्‍ट्रीय सल्‍लागार समिती

19 एप्रिल 2011

प्रिय अण्‍णा हजारेजी,

आपल्‍या 18 एप्रिल 2011 च्‍या पत्राबद्दल धन्‍यवाद.

आपल्याला यापूर्वीच्‍या पत्रात मी जे लिहिले होते, तीच बाब मी पुनश्‍च इथे नमूद करु इच्छिते की, लाचखोरी व भ्रष्‍टाचार यांच्‍या विरोधातील लढा ही तातडीची गरज आहे, असे मी मानते. सार्वजनिक जीवनातील सचोटीसाठीच्‍या संघर्षाला असलेल्‍या माझ्या बांधिलकीविषयी आपल्‍या मनात अजिबात शंका नसावी. संसदीय लोकशाहीच्‍या परंपरा व व्‍यवहार यांच्‍याशी सुसंगत असणा-या लोकपाल या संस्‍थेला माझा पूर्ण पाठिंबा आहे.

लोकपाल विधेयक हे राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीसमोरील कार्यक्रमपत्रिकेचा ए‍क खास भाग होता. आपल्‍याला ठाऊकच आहे की, राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीच्‍या श्रीमती अरुणा रॉय यांच्‍या नेतृत्‍वाखालील पारदर्शकता, उत्‍तरदायित्‍व व राज्‍यकारभार यासंबंधीच्‍या कार्यगटाने 4 एप्रिल रोजी या विषयावर एक बैठक बोलावली होती. या बैठकीत आता संयुक्‍त समितीत असलेल्‍या श्री. शांती भूषण, श्री. संतोष हेगडे व श्री. प्रशांत भूषण तसेच स्‍वामी अग्निवेश, श्री. अरविंद केजरीवाल यांसह नागरी समाजाच्‍या अनेक प्रतिनिधींचा समावेश होता. ज्‍यांच्‍या नावांचा उल्‍लेख केला आहे, ती मंडळी आपल्‍याशी जवळून संबंधित आहेत. कार्यगटाने यापुढेही अशा विचारविनिमय बैठका घ्‍यायचे ठरवले आहे. राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीच्‍या 28 एप्रिल रोजी व्‍हावयाच्‍या बैठकीतील चर्चा व मंजुरीसाठीची व्‍यापक तत्‍वे या बैठकांतून निश्चित करावयाची आहेत.

वस्‍तुतः आपल्‍या 8 एप्रिलच्‍या पत्रात, जे माझ्या कार्यालयाला दुपारच्‍या सुमारास मिळाले, स्‍वतः तुम्‍ही म्‍हटले आहेः

‘मी आपल्‍या निदर्शनास आणू इच्छितो की, समाजातील माहीतगार मंडळींसोबत घेण्‍यात आलेल्‍या आपल्‍या राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीच्‍या उपसमितीच्‍या बैठकीत प्रदीर्घ चर्चांनंतर दोन प्रश्‍न वगळता लोकपाल विधेयकासंबंधीच्‍या व्‍यापक आशयाला मान्‍यता देण्‍यात आली.

‘मी आपल्‍याला विनंती करतो की, कृपया राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीच्‍या संपूर्ण बैठकीतील चर्चेचा मसुदा आपण लवकरात लवकर मिळवावा आणि त्‍यातील निर्णयांची सरकारला शिफारस करावी.’

नु‍कतेच मी वर नमूद केल्‍याप्रमाणे, पुढच्‍या घटनांनी (ज्‍यांची तुम्‍हाला कल्‍पना आहे) चालू प्रक्रियेवर आघाडी घेईपर्यंत राष्‍ट्रीय सल्‍लागार समिती याच दिशेने वाटचाल करत होती.

प्रसारमाध्‍यमांद्वारे जी विधाने व्‍यक्‍त होत आहेत, त्‍यासंबंधात बोलायचे झाल्‍यास मी आपल्‍याला खात्री देते की, या बदनामी मोहिमेच्‍या राजकारणाला माझा कोणत्‍याही प्रकारे पाठिंबा नाही तसेच त्‍यास मी उत्‍तेजन देत नाही.

शुभेच्‍छांसहित,

आपली विश्‍वासू,

सही/-

Monday, March 7, 2011

परिवर्तनवादी चळवळीपुढील सामायिक आव्हाने व पेचः विचारविनिमय बैठक …..एक वृत्तांत


अनेकदा मोर्चे, आंदोलने झाल्‍यावर अनौपचारिक चर्चांत 'आपण एवढे काम रुनही राजकीय स्तक्षेपाची ताकद निर्माण होत नाही' तसेच पुरोगामी प्रवाहांमध्‍ये मतभेदांबरोबरच जे 'सामायि पुरोगामी'पण आहे, त्‍यावर 'व्‍यापक एकजूट का होत नाही' असे प्रश्‍न परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्‍यांच्‍या बोलण्‍यात येत असतात. परिवर्तनवादी चळवळी म्‍हणत असता, सर्वसाधारणपणे कम्‍युनिस्‍ट, समाजवादी, फुले-आंबेडकरवादी तसेच लोकशाही-मानवतावादी प्रवाह इथे गृहीत आहेत. या चर्चेला काही औपचारिक स्‍वरुप द्यावे, या हेतूने आम्‍ही (उल्‍का महाजन, दत्‍ता बाळसराफ व सुरेश सावंत) वैयक्तिक पातळीवर एक बैठक बोलवायचे ठरवले.

या र्चेत कोण सहभागी होऊ शकते, याविषयी ज्‍या काही सूचना आल्‍या त्‍यानुसार ३०ते ५० वयोगटाच्‍या आसपास असलेल्‍या कार्यकर्त्‍यांना निमंत्रित करावे, असे आम्‍ही ठरवले. स्‍वातंत्र्य, संयुक्‍त महाराष्‍ट्र, युक्रांद, पँथर आदि चळवळींतील प्रत्‍यक्ष सहभागातून प्राप्‍त झालेल्‍या ऐतिहासिक ओझ्यांचे (लहान वयामुळे अथवा जन्‍मच झालेला नसल्‍याने) जे वाहक नाहीत, तथापि, त्‍यांचा प्रगतीशील वारसा मानणा-या तसेच या संदर्भांचा परिचय असलेल्‍या कार्यकर्त्‍यांचा मुख्‍यतः हा विचारविनिमय असावा, अशी अपेक्षा होती. अर्थात, या वयोगटाच्‍या वर असलेल्‍यांनाही निमंत्रित करण्‍यात आले होते. यात अभ्‍यासक, पत्रकार, विचारवंत तसेच ज्‍येष्‍ठ कार्यकर्त्‍यांचाही सहभाग होता.

जागेचा विचार करत असताना साने गुरुजी स्‍मारकाच्‍या संचालकांनी सहकार्याचा हात पुढे केला. बैठकीची निमंत्रणे तसेच अन्‍य समन्‍वयाच्‍या व व्‍यवस्‍थेच्‍या जबाबदारीसाठी आमचे कार्यकर्ते मित्र उमेश खाडे व त्‍यांचे सहकारी यशवंत, सोनाली, सुनील, प्रणाली इ. मंडळी पुढे आली.

ही बैठक २५ ते २७ फेब्रुवारी २०११ या कालावधीत साने गुरुजी स्‍मारक, माणगाव, जि. रायगड येथे झाली. या बैठकीस जवळपास ९५ जणांना आमंत्रित करण्‍यात आले होते. त्‍यातील सुमारे ५० जणांनी आपण येणार असल्‍याचे कळवले होते. प्रत्‍यक्षात विविध कारणांनी यातील अनेकजण येऊ शकले नाहीत. या बैठकीस प्रत्‍यक्ष उपस्थितांची संख्‍या ४० होती. अनेक जणांना आमच्‍याकडून निमंत्रण द्यायचे राहून गेले होते.

'राजकीय हस्‍तक्षेपाची ताकद' व 'व्‍यापक एकजूट' या दोन मध्‍यवर्ती मुद्द्यांचा शोध १) आपापल्‍या जनसंघटना २) पुरोगामी राजकीय पक्ष व त्‍यांच्‍या आघाड्या तसेच ३) अन्‍य सामाजिक, सांस्‍कृतिक संघटना या ३ घटकांमधून घेणे, त्‍यावरील संभाव्‍य उपाय व उपक्रमांची नोंद करणे, या उपाय व उपक्रमांवर चर्चा करुन सहमतीच्‍या उपाय व उपक्रमांची यादी करणे... हा या बैठकीचा सर्वसाधारण कार्यक्रम होता.

पहिल्‍या दिवशीच्‍या पहिल्‍या सत्रातील चर्चेसाठी काही मुद्दे ठरवण्‍यात आले होते, ते असेः

१. मुद्द्यांवरचे लढे राजकीय ताकदीत रुपांतरित होताना दिसत आहेत का ? नसतील तर त्‍याची कारणे कारणे काय?

२. पुरोगामी शक्‍तींच्‍या एकजुटीसमोरील आव्‍हाने कोणती ?

३. सैद्धांतिक दिशा किंवा विचारधारा आजच्‍या संदर्भात तपासण्‍याची गरज आहे काय ? असल्‍यास कशाप्रकारे ?

४. वर्गीय जाणिवा जाग्‍या होताना दिसत आहेत का ? दिसत असल्‍यास कशाप्रकारे ? नसल्‍यास त्‍याची कारणे काय?

यानंतर 'राजकीय हस्‍तक्षेप' हे सूत्र दुस-या सत्रातील चर्चेसाठी ठेवण्‍यात आले होते. दुस-या दिवशी 'व्‍यापक एकजूट' या सूत्रावर चर्चा होणार होती तर तिस-या दिवशी, उपाय, संभाव्‍य आकृतिबंधासंबंधी चर्चा अशी ही ३ दिवसांची रचना करण्‍यात आली होती.

पहिल्‍या दिवशीच्‍या चर्चेला आलेले काहीसे विस्‍कळीतपण सोडले तर बाकीची सर्व चर्चा ब-यापैकी सुसूत्र झाली. एकूण चर्चेला मदतकारक होण्‍याच्‍या दृष्‍टीने दुस-या दिवशी डॉ. यशवंत सुमंत यांचे 'राज्‍यसंस्‍थेचे बदलते स्‍वरुप' या विषयावर खास व्‍याख्‍यान ठेवण्‍यात आले होते.

या ३ दिवसांत झालेल्‍या चर्चेतील काही महत्‍वाचे मुद्दे व व्‍यक्‍त झालेली मते संक्षिप्‍त स्‍वरुपात खाली देत आहेः

· बदलत्‍या वातावरणात मुद्द्यांवरची लढाई आपण समग्र करु शकलो नाही. आज बाहेर लोकांसमोर विश्‍वासार्ह नेतृत्‍व नाही. पुरोगामी परंपरेतील कार्यकर्ते त्‍यांना विश्‍वासार्ह वाटतात. पण त्‍या मुद्द्यापुरताच त्‍यांचा संबंध राहतो. अन्‍य प्रश्‍नांसाठी लोक आजच्‍या प्रचलित राजकीय कार्यकर्त्‍यांकडे जातात. त्‍या अनेकविध प्रश्‍नांच्‍या, अडचणींच्‍या सोडवणुकीसाठी आपण लोकांना उपलब्‍ध नसतो. चळवळींत कप्‍पेबंदपणा आला आहे. त्‍यांत विखंडितपणा वाढतो आहे. एकसंधता दिसत नाही.

· आज महाराष्‍ट्रात पुरोगामी चळवळीचे एन.डी.पाटील व भाई वैद्य हे दोन खुंटे आहेत. त्‍यांची व्‍यापक मान्‍यता लक्षात घेता ते योग्‍यही आहे. तथापि, त्‍यांची वये लक्षात घेता राज्‍यव्‍यापी प्रतिमा असलेली नवी नेतृत्‍वं आपण उभी करणे आवश्‍यक आहे. असे नेतृत्‍व करु शकणारे कार्यकर्ते महाराष्‍ट्रात आहेत. पण ते स्‍वतःला एकएका प्रश्‍नापुरते सीमित करुन आहेत.

· मध्‍यपूर्वेतील घडामोडी किंवा लॅटिन अमेरिकेतील बदल लक्षात घेतले तर आज जनकेंद्री डावे आंदोलन उभा राहण्‍याचा काळ आहे का, याचा विचार करावा करायला हवा. लाटा आदळणार आहेत. लोक पक्षाची वाट बघणार नाहीत. अशावेळी आंदोलन व पक्ष यांचा विचार एकत्रच करणे आवश्‍यक आहे का ? ....या प्रश्‍नावरील चर्चेत याप्रकारेही मत व्‍यक्‍त झालेः अभिजात अर्थाने कम्‍युनिस्‍ट पक्ष हे वैचारिक केंद्र असते, तो सत्‍ता हातात घेत नसतो, पक्षाकडून मिळालेल्‍या मार्गदर्शनाप्रमाणे जनआंदोलनात अन्‍य पुरोगामी शक्‍तींशी लोकशाही निर्णयप्रक्रियेने पक्षकार्यकर्ता सहकार्य करतो. त्‍यामुळे जनआंदोलन व पक्ष यांत द्वैत उभे राहण्‍याचा प्रश्‍नच येत नाही.

· औद्योगिक भांडवलशाहीचा अंत होऊन आता वित्‍तीय भांडवलशाहीचा काळ सुरु झाला आहे. आजच्‍या प्रश्‍नांना एकास एक असे उत्‍तर नाही. गुंतागुंत वाढली आहे. केवळ फुले-आंबेडकर आपल्‍याला तरुन नेणार नाहीत.

· आज संगणक क्रांती सर्वव्‍यापी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज या क्षेत्रात पुढे येतो आहे. संगणकाला एकेकाळी झालेला विरोध अनाठायी होता. भांडवलशाहीतूनच पुढची अवस्‍था येणार आहे. अशावेळी भांडवलशाहीने जन्‍माला घातलेल्‍या तंत्रसाधनांचा वापर नाकारणे अयोग्‍य आहे. ....या मतांच्‍या बरोबर विरोधी मतही व्‍यक्‍त झाले. संगणकाला विरोध हा त्‍यामुळे येणा-या बेकारीला विरोध होता. तो बरोबरच होता. आज ओबीसी समाज या क्षेत्रात दिसत असला तरी सूत्रे कोणाच्‍या हातात आहेत, हे पाहणे आवश्‍यक आहे. तंत्रज्ञान व जागतिकीकरण या दोन वेगळ्या गोष्‍टी आहेत. तंत्रज्ञानाला पाठिंबा असणारे जागतिकीकरणाच्‍या विरोधात असू शकतात. तंत्रज्ञानात झालेल्‍या प्रगतीने लोकांचे जीवनमान उंचावते, असे नव्‍हे.

· जुन्‍या काळात चळवळींना मिळणारा प्रतिसाद आणि आताचा क्षीण प्रतिसाद या स्थितीस आपली वैचारिक धारणा कारण आहे. वर्गाला जसे आपण महत्‍व दिले, तसे जातीप्रश्‍नाला दिले नाही. डाव्‍या नेतृत्‍वाच्या तात्त्विक, व्‍यावहारिक मर्यादा आजच्‍या स्थितीस कारण आहेत. कोणत्‍याही एकजुटीसाठी वैचारिक एकजूट सर्वाधिक महत्‍वाची असते.

· आपल्‍या एकजुटीच्‍या आड फक्‍त वैचारिक मतभेदांपेक्षाही इतर अनेक बाबी कारण आहेत. एकाच प्रश्‍नावर काम करणा-या संघटनांची जूट न होण्‍यात नेतृत्‍वाचे वैयक्तिक अहंगंड आड येतात. वैचारिकतेपेक्षाही खरे म्‍हणजे या अन्‍य बाबीच अधिक परिणाम घडवतात.

· काहीवेळा तात्‍पुरत्‍या लाभासाठीची सबगोलंकारी एकजूट ही भविष्‍याच्‍या दृष्‍टीने मारक ठरते. 'रिडालोस'वर अनेकांनी यासंदर्भात मते व्‍यक्‍त केली. ती फसवी एकजूट होती, ही सर्वसाधारण प्रतिक्रिया होती.

· लोकांकडे सत्‍ता जाणे, लोक सिद्ध होणे-प्रसंगी संघटना क्षीण झाली तरी चालेल-यास महत्‍व द्यायला हवे. याचा अर्थ, राज्‍य किंवा केंद्र या सत्‍तांना कमी लेखणे नव्‍हे. 'मेंढालेखा'ने पुढे आणलेली 'दिल्‍ली-मुंबईत आमचं सरकार, आमच्‍या गावात आम्‍हीच सरकार' ही घोषणा पूर्णत्‍वाने लक्षात घेणे आवश्‍यक आहे.

· विकासप्रक्रियेचा लाभ दलित, मुस्लिमांना होतो, पण गावातील निर्णयप्रक्रियेत त्‍यांचा सहभाग नसतो. त्‍यांची सिद्धता कशी करायची ?

· जातीलाच जातीचे दुखणे कळते, ते इतरांना कळू शकत नाही, हा विचार योग्‍य आहे का ?

· बचत गट तसेच ग्रामपंचायतीतील महिलांच्‍या प्रवेशाने जे नवे चैतन्‍य महिलांच्‍यात मोठ्या प्रमाणात दिसते आहे, त्‍याची योग्‍यप्रकारे नोंद आपल्‍याकडून घेतली जाते, असे वाटत नाही.

· वैचारिक मतभेद तीव्रतेने मांडले जाण्‍यात गैर काही नाही. पण जराही वेगळे बोलणारा आमच्‍यातला नव्‍हे, अशी भूमिका घेतली जाते, हे बरोबर नाही. व्‍यापक आघाडीत वैचारिकतेचे टोक किती गाठायचे याला मर्यादा असावी लागते. यासंबंधातल्‍या चर्चेत भाग घेताना संजीव चांदोरकर यांनी भांडवलदारांच्‍या या संदर्भातल्‍या वागण्‍याचा दाखला दिला. भांडवलदार कितीही आपसात भांडले तरी परस्‍परांच्‍या धंद्याला खोट बसू देत नाहीत. त्‍यांचे हितसंबंध आपल्‍यापेक्षा कितीतरी जास्‍त असतात. तरीही ते हा समज दाखवतात. आपण तर 'ओसाड' गावचे राजे. आपण हा समज दाखवत नाही. 'वैचारिक पाया' ची चर्चा तासन् तास चालते. पण एकत्र कसे राहायचे, याची चर्चा, त्‍याचे यमनियम आपण ठरवत नाही. भांडवलदार लांब पल्‍ल्‍याची आखणी करतात. आपल्‍यालाही जे करायचे आहे, ते पुढच्‍या पिढीसाठी, हे आपण लक्षात घ्‍यायला हवे, असे ते म्‍हणाले.

· आपण निवडणुका लढायला घाबरतो. घाण साफ करायची तर नाल्‍यात उतरावे लागते. नाल्‍यात उतरले की थोडी घाण आपल्‍या अंगावरही उडणार. त्‍यास आपण घाबरता कामा नये, असे मत पिंपरी चिंचवडचे नगरसेवक मारुती भापकर यांनी स्‍वतःच्‍या अनुभवांच्‍या आधारे मांडले.

· डॉ. यशवंत सुमंत यांनी बदलत्‍या राज्‍यसंस्‍थेचे स्‍वरुप स्‍पष्‍ट करताना ९० नंतरच्‍या उत्‍तर औद्योगिक काळात संस्‍थीभवनाचे पॅटर्न बदलल्‍याचे नमूद केले. औद्योगिक भांडवलशाहीने राष्‍ट्रराज्‍य संकल्‍पना व गतिमानता दिली. आता सिटिझन ऐवजी नेटिझन व्‍हायला लागलो आहोत. तंत्रज्ञान नाकारणे हे अनैतिहासिक आहे. तथापि, वाढत्‍या कनेक्टिव्हिटीत मानवी प्राण कसे ओतणार हा प्रश्‍न असल्‍याचे ते म्‍हणाले. कामगार व किसान हे चळवळीचे आधार या पूर्वीच्‍या अर्थाने आता कालबाह्य झाले आहेत. नव्‍या मध्‍यमवर्गातले काही जण निराभास होत आहेत, हे लक्षात घेऊन त्‍यांच्‍याशीही संबंध जोडले पाहिजेत, असेही ते पुढे म्‍हणाले. चर्चेच्‍या पुढच्‍या क्रमात बोलताना त्‍यांनी अनेक महत्‍वाच्‍या मुद्द्यांना स्‍पर्श केला. नवी चिकित्‍सा उभी करणारे त्‍या त्‍या जातीत, समाजविभागांत उभे राहायला हवेत. तसे काही उभे राहतही आहेत. त्‍यांना आपण बाहेरुन साथ द्यायला हवी. ते एकटे पडता कामा नयेत, असे मुद्दे त्‍यांच्‍या मांडणीत होते. ...त्‍यांच्‍या मांडणीवर चर्चा करताना वित्‍त भांडवलाचं अस्तित्‍व औद्योगिक भांडवलावर असते, अशी थोडी सैद्धांतिक चिकित्‍साही झाली.

· काही जुन्‍या समजुतींसमोर नव्‍या संशोधनाने प्रश्‍नचिन्‍ह उभे केले आहे, हे आपण लक्षात घ्‍यायला हवे, असे मिलिंद बोकीलांचे म्‍हणणे होते. प्राचीन काळी आदिम समाज हा स्‍त्रीसत्‍ताक होता, या समजुतीचा फेरविचार करायला हवा तसेच एकलव्‍याचा अंगठा मागणा-या द्रोणाचार्यांच्‍या हेतूबद्दल शंका नसली तरी जगात कोणीही आदिवासी बाण सोडताना अंगठ्याचा वापरच करत नाहीत, अगदी ऑलिंपिकमध्‍येसुद्धा याचीही आपण नोंद घ्‍यायला हवी, असे ते म्‍हणाले. आर्य-द्रविड संघर्षाचा संदर्भ देत भारतीय इतिहासाचे सुलभीकरण करता कामा नये, या मुद्द्याकडे त्‍यांनी लक्ष वेधले. भारतात कोण कधी आले ते आपल्याला नक्की सांगता येत नाही. त्यामुळे त्या विषयी भ्रामक तर्क करू नये. नवीन संशोधनाच्या उजेडात कायम तपासून पहावे असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

· पुढील उपाययोजनांसंबंधी तसेच आकृतिबंधाबाबत आलेल्‍या काही सूचना अशा आहेतः

o नव्‍या कार्यकर्त्‍यांची तयारी करणारी शिबिरे घेण्‍यासाठी साने गुरुजी राष्‍ट्रीय स्‍मारकारख्‍या जागांचा वापर करावा. या स्‍मारकात अशा शिबिरांचे आयोजन करण्‍याची जबाबदारी राजन इंदुलकर यांनी घ्‍यावी, अशी सूचना गजानन खातू यांनी मांडली.

o संजीव साने यांनी केलेल्‍या लेखी सूचनांत राष्‍ट्रसेवा दलाला संघटित मदत करणे, आपापल्‍या कार्यक्षेत्रात, स्‍थानिक ठिकाणी अभ्‍यासमंडळे, व्‍याख्‍यानमाला, राज्‍यव्‍यापी/विभागवार परिवर्तनवादी विचारांचे सांस्‍कृतिक जलसे/साहित्‍य चर्चा यांचे आयोजन, तीन महिन्‍यांनी या तसेच अन्‍य सूचनांवर काही काम तसेच अधिक विचार करुन परत येथेचे दोन दिवसांकरता भेटावे यांचा समावेश होता.

o पुढच्‍या चर्चांमधून विविध समाजघटकांचे मानस तसेच राजकीयीकरण म्‍हणजे काय अशा मुद्द्यांची चर्चा व्‍हावी, कार्यकर्ता व अभ्यासक यांचा समावेश असलेले 'विचारवेध संमेलन' (जे सध्‍या थांबवण्‍यात आले आहे) नव्‍या स्‍वरुपात सुरु करावे, 'सांस्‍कृतिक क्षेत्रातील हस्‍तक्षेप' याबाबत दत्‍ता बाळसराफ व सुरेश सावंत यांनी तयारी करावी या सूचना उल्‍का महाजन यांनी केल्‍या.

o विविध विचारसरणींचा परिचय करुन देणारी ३ ते ५ दिवसांची शिबिरे घेण्‍याची जबाबदारी डॉ. यशवंत सुमंत यांनी स्‍वतःहून घेतली. (सध्‍या लोकमतमध्‍ये एक रविवार आड याच विषयावर त्‍यांचे सदर असते.)

o केशव गोरे स्‍मारकातून महत्‍वाच्‍या विषयांवरचे लेख झेरॉक्‍स करुन जिज्ञासूंना पाठवले जाण्‍याची व्‍यवस्‍था सुरु असल्‍याचे सांगून आपणही आपली यादी तेथे असलेल्‍या ज्‍योती केळकर यांच्‍याकडे द्यावी, असे गजानन खातू यांनी सांगितले.

o पर्यावरणीय अर्थशास्‍त्र या विषयावर पार्थ बापट यांनी एक शिबीर घेण्‍याची तयारी दाखवली.

o सांस्‍कृतिक राजकारण या विषयावरील उपक्रमांत अंकांची भेटयोजना, फिरती प्रदर्शने आयोजित करावीत, असे हरीश सदानी यांनी सुचविले.

o अनेक कार्यकर्ते यावेळी येऊ शकले नाहीत. या चर्चेची गरज लक्षात घेता एक सैल असा मंच तयार करावा, असे राजन इंदुलकर यांनी सुचविले.

o राज्‍यातल्‍या कार्यकर्ते, नेते यांचे प्रोफायलिंग करण्‍याची, रिसोर्स मॅपिंग करण्‍याची जबाबदारी राजू भिसे यांनी घेतली. अशारीतीच्‍या बैठका जिल्‍हा पातळीवर व्‍हाव्‍यात, अशीही सूचना त्‍यांनी मांडली.

o दत्‍ता बाळसराफ यांनी अशारीतीच्‍या बैठकांना दुजोरा दिला व मराठवाडा-विदर्भातल्‍या कार्यकर्त्‍यांची बैठक औरंगाबादला निलेश राऊत यांनी आयोजित करावी, अशी सूचना केली.

o राजन इंदुलकर यांनी कोकण महोत्‍सवासारखे उपक्रम राबवावेत अशी युवराज मोहिते यांची सूचना असल्‍याचे सांगितले. (युवराज मोहिते शेवटच्‍या दिवशी नव्‍हते)

o संपर्क-संवादाचे एक माध्‍यम म्‍हणून एक ब्‍लॉग तयार करावा तसेच आपल्‍या चळवळीचे साहित्‍य इंटरनेटवर सहजरित्‍या उपलब्ध होण्‍यासाठी युनिकोडचा वापर वाढवला पाहिजे, अशी सूचना सुरेश सावंत यांनी केली.

o ब्‍लॉग, युनिकोडसंबंधीच्‍या वरील उपक्रमात टायपिंग करणारा गट आम्‍ही तयार करु असे सोनाली शिंदे यांनी सांगितले.

o विकिपीडियावरील दोन नोंदी दर महिन्‍याला संपादित कराव्‍यात, अशी सूचना चैत्रा रेडकर यांनी केली.

o या बैठकीचे निमंत्रणपत्र हे मेंदूपेक्षा हृदयाला अपील करणारे होते, असे संजीव चांदोरकर म्‍हणाले. पुढच्‍या निमंत्रणात कोणाला बोलवायचे याच्‍या निकषांची निमंत्रित व निमंत्रक या दोहोंना स्‍पष्‍टता असावी. किमान समान कार्यक्रम, वैचारिक व व्‍यवहाराच्‍या स्‍पष्‍टतेचा किमान आराखडा तयार व्‍हावा, अशी त्‍यांनी सूचना व अपेक्षा व्‍यक्‍त केली.

या सूचनांनंतर निमंत्रक या नात्‍याने दत्‍ता बाळसराफ, उल्‍का महाजन व सुरेश सावंत यांनी संबंधितांचे आभार मानून बैठक संपल्‍याचे जाहीर केले.

- सुरेश सावंत,

-sureshsawant8@hotmail.com/ 9892865937

Tuesday, March 1, 2011

अन्‍नसुरक्षा व अर्थसंकल्‍प 2011

अर्थसंकल्‍पावरील आजच्‍या 'प्रहार'मध्‍ये प्रसिद्ध झालेली प्रतिक्रिया

अन्‍न सुरक्षेच्‍या दृष्‍टीने चिंतेच्‍या वा कळीच्‍या मुद्द्यांचे सूतोवाच या अर्थसंकल्‍पात जरुर केले गेले, पण त्‍यासाठीची पुरेशी आर्थिक तरतूद मात्र झालेली दिसत नाही. डाळी, तेलबिया यांचे उत्‍पादन गरजेच्‍या कमी असल्‍याने आपण त्‍यांच्‍या आयातीवर अवलंबून असतो. सरकार कमी पावसाच्‍या प्रदेशात 60 हजार ‘डाळींची गावे’ हा उपक्रम सुरु करणार आहे. त्‍यात डाळींचे उत्‍पादन तसेच त्‍यांची बाजाराशी सांगड यांस चालना देण्‍यात येणार आहे. याचरीतीने पामतेलासाठी पामची लागवड 60 हजार हेक्‍टर क्षेत्रात करण्‍यासाठी उत्‍तेजन देण्‍यात येणार आहे. ज्‍वारी, बाजरी, नाचणी यांसारख्‍या पौष्टिक भरड धान्‍यांचे उत्‍पादन प्रचंड घटले आहे. ते वाढवणे तसेच त्‍याच्‍या उपयुक्‍ततेचा प्रचार व प्रसार करणे यावर खास भर दिला जाणार आहे. या तिन्‍ही महत्‍वाच्‍या उपक्रमांसाठी खर्चाची तरतूद मात्र प्रत्‍येकी 300 कोटी रु. इतकी अल्‍प करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे त्‍यांस केवळ प्रतीकात्‍मकच अर्थ राहण्याची शक्‍यता दिसते. साठवणुकीची नीट व्‍यवस्‍था नसल्‍याने धान्‍याची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. त्‍यासाठी गोदामांची संख्‍या वाढवण्‍याचे सरकारचे प्रयत्‍न आहेत. पण त्‍यासाठी खाजगी गुंतवणुकीवरच सरकार अवलंबून असल्‍याचे दिसते.

गरिबांच्‍या अन्‍नसुरक्षेसाठी धान्य तसेच केरोसीन इ. चे वितरण ज्‍या रेशनव्‍यवस्‍थेद्वारे होते ती अधिक परिणामकारक करण्‍यासाठीची दोन महत्‍वपूर्ण पावले सरकारने आधीच टाकली आहेत, त्‍यांचेही सूतोवाच या अर्थसंकल्‍पात करण्‍यात आले आहे. त्‍यातील एक म्‍हणजे, अन्‍न सुरक्षा कायदा. या कायद्यातील तरतुदींसंबंधी सत्ताधा-यांमध्‍येच खूप मतभेद आहेत. त्‍यावर सहमतीचे प्रयत्‍न चालू आहेत. यासंबंधीचा मसुदा जवळपास तयार झाला असून त्‍यासंबंधीचे विधेयक याचवर्षी मांडले जाईल, असे अर्थसंकल्‍पात जाहीर करण्‍यात आले आहे. अर्थात, प्रत्‍यक्षात हा कायदा तयार व्‍हायला वेळ लागणार असल्‍याचे सरकारला माहीत असल्‍याने त्‍यासाठीची खास आर्थिक तरतूद यावेळी करण्‍यात आलेली नाही. दुसरे महत्‍वाचे पाऊल म्‍हणजे, घरगुती वापराचा गॅस, खते व रेशनचे रॉकेल सवलतीच्‍या दरात देण्‍याऐवजी त्‍यासाठीचे अनुदान थेट लाभार्थ्‍यांना देणे. ही योजना टप्‍प्‍याटप्‍प्‍याने राबवली जाणार आहे. तत्‍पूर्वी त्‍याची प्रायोगिक चाचणी करण्‍यात येणार आहे. श्री. नंदन नीलकेणी यांच्‍या नेतृत्‍वाखाली या प्रायोगिक प्रकल्‍पाची आखणी करण्‍यासाठी ‘टास्‍क फोर्स’ नेमण्‍यात आला आहे. सरकारची ही पावले स्‍वागतार्ह आहेत.

- सुरेश सावंत

Tuesday, February 15, 2011

अन्न अधिकार कायद्याच्या मसुद्यासंबंधीचे टिपण


राष्ट्रीय सल्लागार समितीचा प्रस्ताव



21 जानेवारी, 2011

नवी दिल्‍ली


संपादित मराठी आवृत्‍ती


(विभाग 1 मधील Executive Summary चा अनुवाद केलेला नाही)

विभाग 2 – राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा विधेयकाचा आराखडा

भाग I

(येथील 1. ओळख Introduction व 2. उद्दिष्‍टे Objective यांचा अनुवाद केलेला नाही)

3 अत्‍यावश्‍यक अधिकार

3.1. सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था

3.1.a. ग्रामीण क्षेत्रः

· ‘(exclusion criteria)वगळण्‍याच्‍या निकषां’पैकी एकही निकष ज्‍या कुटुंबांना लागू होत नाही, अशा कुटुंबांना दरमहा रेशनवर अनुदानित धान्‍य मिळण्‍याचा अधिकार राहील.

· (priority category) प्राधान्‍य गटाला दरमहा 35 किलो धान्‍य (प्रति व्‍यक्‍ती 7 किलो या प्रमाणे) अनुदानित दराने म्‍हणजे 1 रु. भरड धान्‍य, 2 रु. गहू व 3 रु. तांदूळ असे मिळेल.

· (general category) सर्वसाधारण गटाला दरमहा 20 किलो धान्‍य (4 किलो प्रति व्‍यक्‍ती प्रमाणे) भरड धान्‍य, गहू व तांदूळ यांच्‍या किमान आधारभूत किंमतीच्‍या 50 टक्‍क्यांपेक्षा कमी दराने मिळेल.

· ग्रामीण भागातील किमान 90 टक्‍के लोकांना हा अनुदानित रेशनचा अधि‍कार मिळेल.

· त्‍यापैकी 46 टक्‍के लोकांचा प्राधान्‍य गटात समावेश होईल.

· NAC ‘सामाजिक समावेश (social inclusion) पद्धती सुचवत आहे. त्‍यानुसार सामाजिक व आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल अशा काही विशिष्‍ट समाजविभागांतील कुटुंबांचा शोध घेऊन त्‍यांना या कायद्याचे संपूर्ण संरक्षण देण्‍यात येईल.

3.1.b. शहरी क्षेत्रः

· शहरी क्षेत्रासाठी ग्रामीण क्षेत्राप्रमाणेच प्राधान्‍य गट व सर्वसाधारण गटांचे अधिकार असतील.

· शहरी क्षेत्रातील एकूण 50 टक्के लोकांना हा अनुदानित रेशनचा अधि‍कार मिळेल.

· त्‍यापैकी 28 टक्‍के लोकांचा प्राधान्‍य गटात समावेश होईल.

· इथे‍ही ‘सामाजिक समावेश (social inclusion) पद्धतीचा अवलंब करण्‍याची सूचना NAC करीत आहे. बेघर, झोपडपट्टीवासी आणि व्‍यवसाय व सामाजिकदृष्‍ट्या दुर्बल विभागांतील कुटुंबे या कायद्याने पूर्णतः संरक्षित केली जातील.

3.2. मातृत्‍व तथा बाल सहाय्यता (Maternal and Child Support)

· 0-6 वयोगटातील मुलांना पायाभूत पोषण, आरोग्‍य व शालापूर्व शिक्षण यांचा अधिकार एकात्मिक बालविकास सेवा (Integrated Child Development Services (ICDS) योजनेद्वारे मिळेल.

· 1 एप्रिल 2010 पासून सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार कायदेशीर अधिकार म्‍हणून तो आधीच लागू झाला आहे.

· त्‍यात 1) पूरक पोषक आहार, 2) लसीकरण, 3) आरोग्‍य तपासणी, 4) संदर्भ सेवा, 5) मुलांची वाढ व तिला चालना मिळण्‍यासाठीची काळजी 6) शालापूर्व शिक्षण यांचा समावेश होतो.

3.2.a. गर्भवती व स्‍तनदा माता (Pregnant and Lactating Mothers)

a) अंगणवाडी अथवा अन्‍य यथायोग्‍य संस्‍थेद्वारे वर्षभर पुरविला जाणारा पौष्टिक घरी घेऊन जाता येणारा शिधा आणि/अथवा ताजे शिजविलेले भोजन.

b) गरोदरपणातील काळजी घेण्‍यासाठी, पौष्टिक आहारासाठी तसेच गरोदरपणातील व नंतरच्‍या विश्रांतीसाठी रु. 1000 प्रति महिना असे एकूण 6 महिने मातृत्‍व लाभ (Maternity benefits) मिळेल.

c) पहिले 6 महिने बालकांना केवळ स्‍तनपान करावे यासाठी सहाय्य, स्तनपानासंबंधीचा सल्‍ला तसेच आनुषंगिक सहाय्य, 6 महिन्‍यांनतर मुलांना पूरक व उचित पौष्‍टिक आहार देण्‍यासाठीचे तसेच दोन वर्षे व त्‍याहून अधिक वयापर्यंत स्‍तनपान करण्‍यासाठीचे समुपदेशन.

3.2.b. 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील मुले

d) अंगणवाडी अथवा अन्‍य यथायोग्‍य संस्‍थेद्वारे वर्षभर पुरविला जाणारा पौष्टिक घरी घेऊन जाता येणारा शिधा आणि/अथवा ताजे शिजविलेले भोजन.

3.2.c. 3-6 वयोगटातील मुले

e) किमान एक ताजे शिजविलेले जेवण आणि एक पौष्टिक नाश्‍ता स्‍थानिक अंगणवाडीत किमान वर्षातील 300 दिवस मिळेल.

3.2.d. 6-14 वयोगटातील मुले

f) स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमार्फत चालवलेल्‍या शाळा, सरकारी तसेच सरकारी अनुदानित शाळा यांमधील 8 वीपर्यंतच्‍या मुलांना किमान एक ताजे शिजविलेले पौष्टिक मध्‍यान्‍ह भोजन शाळेच्‍या सुट्या वगळता वर्षभर मिळेल.

3.2.e. मुलांना नकार मिळणार नाही

g) 14 वर्षांखालील जे कोणी मूल ताज्‍या शिजविलेल्‍या जेवणासाठी जिथे अशी सोय असते अशा अंगणवाडी, मध्‍यान्‍ह भोजन देणा-या शाळा, निराधारांसाठीची आहार केंद्रे (या कायद्यात स्‍पष्ट केल्‍याप्रमाणे) या ठिकाणी गेले, तर त्‍याला कोणत्‍याही कारणाने जेवण न देता परत पाठवले जाणार नाही.

3.2.f. मुलांच्‍या कुपोषणाचा प्रतिबंध आणि उपचार

a) 6 वर्षे वयापर्यंतची सर्व श्रेणींतील कुपोषित मुले तसेच ज्‍यांची योग्‍य प्रकारे वाढ होताना दिसत नाही किंवा ज्‍यांच्‍यात पौष्टिक मूल्‍यांची घसरण होते आहे, अशांना शोधून काढले जाईल. अशांना पौष्टिक आहाराबद्दल सल्‍ला दिला जाईल. या सल्‍ल्‍यात स्‍थानिक आहाराला साजेसे सुधारित अन्‍न व घ्‍यावयाची काळजी, आरोग्‍य चिकित्‍सा तसेच संदर्भ सेवा यांचा समावेश असेल.

b) अत्‍यंत कमी वजन असलेल्‍या, अल्‍पपोषित अथवा आजारी कुपोषित मुलांना पोषण पुनर्वसन केंद्र किंवा सोयीच्‍या अन्‍य ठिकाणी पूरक आहार दिला जाईल तसेच त्‍यांची विशेष काळजी घेतली जाईल.

3.3. विशेष गटांसाठीचे अधिकार

(i) स्‍थलांतरितः स्‍थलांतरितांना त्‍यांच्‍या सध्‍याच्‍या वास्‍तव्‍याच्‍या ठिकाणी या कायद्यात अंतर्भूत सर्व अधिकार मिळतील यासाठीची व्‍यवस्था केली जाईल.

(ii) निराधार व्‍यक्‍तीः किमान एकवेळ ताजे शिजविलेले पौष्टिक जेवण मोफत मिळण्‍याचा अधिकार असेल.

(iii) बेघर व शहरी गरीबः अशा व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या अनुदानित रेशनच्‍या व्‍यतिरिक्‍तची अन्‍नाची गरज भागण्‍यासाठी परवडणा-या दरांत जेवण देणारी सामाजिक आहारगृहे सुरु केली जातील. प्रथम याची प्रायोगिक चाचणी (पायलट प्रोजेक्‍ट) केली जाईल. या चाचणीच्‍या यशानंतर अशी आहारगृहे सुरु केली जातील तसेच त्‍यांचा विस्‍तार केला जार्इल. प्रत्‍येक शहरात अशा आहारगृहांची किमान संख्‍या निश्चित करण्‍यात येईल.

(iv) आपात्‍काळ तसेच आपत्तिग्रस्‍त व्‍यक्‍तीः अशांना विशेष रेशनकार्डे देण्‍यात येतील. या कार्डांवर मिळणारा लाभ प्राधान्‍य गटांना मिळणा-या अधिकारापेक्षा कमी असणार नाही. किमान एक वर्ष हा लाभ मिळेल. मोफत आहारगृहे तातडीने सुरु करण्‍यात येतील. याचबरोबर या कायद्यात अंतर्भूत सर्व अधिकार त्‍यांना मिळत राहतील, याची काळजी घेतली जाईल.

स्‍पष्‍टीकरणः विभाग 3.2 आणि 3.3 मध्‍ये जेथे जेथे ‘शिजविलेले पौष्टिक जेवण’ असे म्‍हटले आहे, त्‍याचा अर्थ, ताजे शिजवलेले, स्‍थानिक संस्‍कृतीशी अनुरुप, ज्‍यात संबंधित सरकारी विभागांनी निश्चित केल्‍याप्रमाणे वयोगट तसेच लिंगसापेक्ष पौष्टिक मूल्‍यांचा समावेश आहे असे अन्‍न होय. व्‍यापारी हितसंबंध असलेले तयार पदार्थ तसेच अन्‍य खाद्यवस्‍तूंचा पुरवठा करण्‍यास बंदी असेल

3.4. उपासमारीपासून संरक्षण

उपासमार होत असलेली कोणीही व्‍यक्‍ती अथवा कुटुंब अतिरिक्‍त सहाय्यासाठी पात्र असेल. हे सहाय्य तातडीने, मोफत व कोणत्‍याही अटींशिवाय सर्व साधनांनिशी दिले जाईल. अशा प्रत्‍येक राज्‍य सरकारने यासाठीची पद्धती ठरविणे हे त्यांचे कर्तव्‍य राहील.

3.5. अधिकारांत घट करता येणार नाही

प्रमाण कमी करुन, किंमती वाढवून अथवा अन्‍य प्रकारे रेशनवर मिळणा-या अधिकारांत किमान 12 व्‍या पंचवार्षिक योजनेच्‍या अखेरीपर्यंत घट करता येणार नाही. अन्‍य अधिकार कायद्यात दुरुस्‍ती केल्‍याशिवाय घटवता येणार नाहीत. अधिकारांत समाविष्‍ट खाद्य तसेच अखाद्य वस्‍तूंची रोख किंमत महागाई निर्देशांकाशी सुसंगत राहून वाढवली जाईल.

4 अंमलबजावणी यंत्रणा आणि रेशन

4.1. अंमलबजावणी यंत्रणा

4.1.1. या कायद्याचे समन्‍वयक मंत्रालय (The nodal Ministry) म्हणून ग्राहक व्‍यवहार, अन्‍न व सार्वजनिक वितरण मंत्रालय काम पाहील.

4.1.2. हे अधिकार रेशन, अंगणवाडी, मध्‍यान्‍ह भोजन यांसारख्‍या अन्‍नासंबंधीच्‍या खास योजनांद्वारे दिले जातील. या योजना केंद्रसरकारच्‍या मार्गदर्शक सूत्रांनुसार राज्‍य सरकारे अंमलात आणतील. या संस्‍थात्‍मक यंत्रणा दुरस्‍त, अधिक प्रवाही तसेच सुधारित केल्‍या जाऊ शकतील.

4.1.3. प्रस्‍तावित अन्‍न अधिकार विशिष्‍ट काळात (दोन ते तीन वर्षे) अंमलात यायचे असतील तर धान्‍यखरेदीच्‍या सध्‍याचा दरात सातत्‍य ठेवावे लागेल. आपत्‍तीकाळासाठीच्‍या साठ्याचे निकष सुधारावे लागतील. संबंधित मंत्रालयांशी झालेल्‍या विचारविनिमयातून हे शक्‍य असल्याचे दिसते. तथापि, सुधारित प्रोत्‍साहनपर योजनांच्‍या आधारे धान्‍योत्‍पादनाचा लक्षणीय विस्‍तार व वि‍केंद्रित धान्‍यखरेदी आवश्‍यक आहे.

4.2. रेशन सुधारणा

विविध राज्‍यांतील अलिकडच्‍या अनुभवांचा या कायद्यात विचार करण्‍यात आला आहे. सुधारित रेशनमध्‍ये कार्डधारक आणि रेशन दुकानापर्यंतची पारदर्शक यंत्रणा, ग्राहकांना उत्‍तरदायी असलेले सामाजिक संस्‍थांमार्फतचे दुकानाचे व्‍यवस्‍थापन यांचा समावेश असेल. रेशनसाठीची धान्‍य खरेदी, वितरण व व्‍यवस्‍थापन यासंबंधी समग्र सुधारणांचे उपाय कायद्याच्‍या मुख्‍य भागात समाविष्‍ट असतील. ते असेः

a. विकेंद्रित धान्‍यखरेदीः केंद्र सरकार ज्‍या राज्‍यांमध्‍ये धान्‍यउत्‍पादन जादा आहे, अशा राज्‍यांमध्‍ये धान्‍य खरेदीचा विस्‍तार करील. राज्‍य सरकारांना खालून वर जाणारी विकेंद्रित नियोजन प्रक्रिया अवलंबायला प्रोत्‍साहन देईल. खरेदी, त्‍याची साठवणूक व वितरण यांत कमीत कमी वाहतूक खर्च व तोटा होईल यारीतीचे हे नियोजन असेल. 10 किमी त्रिज्‍येच्‍या परिसरात जेथे जेथे शक्‍य असेल तेथे धान्‍यखरेदी केंद्रे सुरु करण्‍यात येतील तसेच शेतक-यांना जागेवरच खरेदीची रक्‍कम दिली जाईल.

b. भरड तसेच अन्‍य पौष्टिक धान्‍यांची खरेदीः केंद्र व राज्‍य सरकारे भरड तसेच अन्‍य पौष्टिक धान्‍येखरेदीला प्रोत्‍साहन तसेच चालना देण्‍यासाठी पावले उचलतील. यात दर्जासंबंधीचे निकष, आधारभूत किंमतींची वेळेवर घोषणा आणि खरेदीची आवश्‍यक ती व्‍यवस्‍था याबाबत दक्षता घेण्‍यात येईल.

c. साठा व वितरणः राज्‍य, जिल्‍हा व तालुका पातळीवर किमान बफर स्‍टॉक साठवता यावा यासाठीची शास्‍त्रीय पायावर आधारित आवश्‍यक अशी पायाभूत यंत्रणा उभारण्‍यासाठी केंद्र व राज्‍य सरकारे जरुर ती पावले उचलतील.

d. प्रोत्‍साहनपर उपाययोजनाः केंद्र सरकार राज्‍यांना पारदर्शी निकषांवर आधारित अर्थसहाय्य वेळेवर देईल तसेच धान्‍य खरेदी, साठा व व्‍यवस्‍थापकीय खर्च यासाठी स्‍वस्‍त क्रेडिट cheap credit देईल.

e. द्वार वितरणः राज्‍य सरकार रेशन दुकानापर्यंत धान्‍य पोहोचवेल. शक्‍यतो राज्‍य नागरी पुरवठा महामंडळांमार्फत हे काम केले जाईल. रेशन दुकानदारांना एफसीआय गोदामातून थेट धान्‍य उचलण्‍यापासून परावृत्‍त केले जाईल. रेशन दुकानाला माल देताना दक्षता समितीच्‍या सदस्‍यांसमोर सार्वजनिकरित्‍या त्‍यांचे वजन केले जाईल.

f. रेशन दुकानांची आर्थिक सक्षमताः रेशन दुकान चालवणे परवडावे यासाठी विविध पावले उचलली जातील. सर्व खर्चाचा विचार करुन योग्‍य कमिशन दिले जाईल. दुकानांसाठीचे धान्‍य नियतन कार्डधारकांची संख्‍या व दुकानातील धान्‍यसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन इंटरनेटच्‍या सहाय्याने ठरवले जाईल.

g. रेशन दुकानांचे समाजाकडून व्‍यवस्‍थापनः रेशन दुकानांचे परवाने देताना ग्राम पंचायत, बचत गट सहकारी संस्था यांना प्राधान्‍य दिले जाईल.

h. महिलांच्‍या हाती व्‍यवस्‍थापनः रेशन दुकाने महिला अथवा महिलांचे समूह चालवतील.

i. पारदर्शितेचे उपायः खास प्रकारचा क्रमांक असलेली फूड कुपन्‍सची पद्धती धान्‍य वितरणाचा मागोवा घेण्‍यासाठी प्रत्‍येक राज्‍य सरकाडून अवलंबण्‍यात येईल. फूड कुपन्‍स (किमान वर्षभरासाठी एक महिन्‍यांच्‍या कुपन्‍सची पुस्तिका) रेशन कार्डातच छापली जातील. क्रमात जिथे कुपन्‍सच्‍या ऐवजी स्‍मार्ट कार्ड अथवा अशाच इतर साधनाचा वापर होईल, तिथे छापील रेशन कार्डे मात्र तशीच राहावीत.

j. तंत्रज्ञानाचा वापर आणि देखरेख व माहिती व्‍यवस्‍थाः राज्‍य सरकार रेाशनव्‍यवस्‍थेचे संपूर्ण संगणकीकरण होईल, याची दक्षता घेईल. या संगणकीकरणात सरकार स्‍वतःहून पुढील माहिती इंटरनेटवर टाकीलः धान्‍यसाठा, या धान्‍यसाठ्याचा रेशन दुकानापर्यंतचा तसेच कार्डधारकापर्यंतचा तारीखवार प्रवास, आर्थिक व्‍यवहार, परवाने तसेच अन्‍ संबंधित माहिती. राज्‍य सरकारे ICT, स्‍मार्ट कार्ड तसेच अन्‍य नावीन्‍यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर यशस्‍वी पायलट प्रोजेक्‍टनंतर करु शकतात.

k. वस्‍तीची (सामाजिक) देखरेखः वस्‍तीने स्‍वतः रेशन दुकानावर लक्ष ठेवण्‍यासाठी सर्व प्रकारच्‍या सुविधा सरकार उपलब्‍ध करुन देईल. यात, हेल्‍पलाईन, SMS द्वारे संदेश, सामाजिक हिशेब तपासणी/लेखापरीक्षण आणि दक्षता समिती यांचा समावेश असेल. प्रत्‍येक रेशन दुकानावर 5 जणांची दक्षता समिती असेल. त्‍यातील 3 सदस्‍य महिला असल्‍या पाहिजेत तसेच बहुसंख्‍या सदस्‍य हे त्‍या दुकानावरील रेशनकार्डधारक असले पाहिजेत. या दक्षता समितीत रेशन दुकानाच्‍या व्‍यवस्‍थापकांपैकी कोणी असणार नाही.

l. सामाजिक लेखापरीक्षणः रेशन दुकानाची सामाजिक हिशेबतपासणी वर्षातून एकदा ग्रामसभेत करण्‍यात येर्इल. गेल्‍या 12 महिन्‍यांतील व्‍यवहाराचा सारांश सार्वजिनकरित्‍या मोठ्याने वाचला जाईल.

m. रेशनकार्डांची रचनाः प्रत्‍येक रेशनकार्डात एक ‘अधिकारांचे पान’ असेल, त्‍यात स्‍थानिक व सोप्‍या भाषेत रेशनवर मिळणा-या अधिकारांविषयी माहिती असेल. याशिवाय हेल्‍पलाईन क्रमांक, तक्रार निवारण सुविधा यांचीही माहिती रेशनकार्डात असेल. कुटुंबातील प्रौढ स्‍त्रीच्‍या नावे रेशनकार्ड असेल.

n. रेशनकार्डावरील नोंदीः रेशन दुकानाचा व्‍यवस्‍थापक या नोंदी ठेवण्‍यासाठी जबाबदार असेल. या नोंदी ताबडतोब, सुवाच्‍य अक्षरात व स्‍वतःच्‍या सहीने त्‍याने ठेवावयाच्‍या आहेत

o. ज्‍यात गडबड करता येणार नाही तसेच लोकांना सहज कळणारी पावतीः अशा पावतीसाठीची साधनसिद्धता दुकानदाराकडे असेल, याची दक्षता घेतली जाईल.

5 खालील तरतुदींसाठीची सक्षम होणे (Enabling Provisions)

अन्‍न व पौष्टिकता सुरक्षितेला अधिक चालना देण्‍यासाठी केंद्र, राज्‍य तसेच स्‍थानिक स्‍वराज्‍यसंस्‍था खालील बाबी प्रत्‍यक्षात येण्‍यासाठी जोरदार प्रयत्‍न करतील:

(i) शेतीसुधारणा तसेच शेतीस ऊर्जितावस्‍था प्राप्‍त व्‍हावी यासाठी सरकारे प्रयत्‍न करतील. योग्‍य मोबदला देणारे भाव, पत, जलसिंचन, पीक विमा, तांत्रिक सहाय्य आदिंमार्फत छोट्या तसेच सीमांत शेतक-यांच्‍या हिताचे रक्षण करण्‍यात येईल. जमीन तसेच पाणी यांच्‍या अनावश्‍यक बिगरशेती वापरास प्रतिबंध करण्‍यात येईल. विकेंद्रित अन्‍नधान्‍य उत्‍पादन, धान्‍यखरेदी व वितरण यांना प्रोत्‍साहन देण्‍यात येईल. शेतीसंबंधित लोकसंख्‍येत बहुसंख्‍य असलेल्‍या तरुण व महिला शेतक-यांकडे खास लक्ष देण्‍यात येईल.

(ii) रेशनवर मिळणा-या वस्‍तूंत विविधता आणण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल. यांत डाळी, भरड धान्‍य, खाद्य तेल तेल तसेच स्‍वयंपाकासाठीचे इंधन यांचा समावेश असेल.

(iii) सुरक्षित व पुरेशा पेयजलाची सार्वत्रिक उपलब्‍धता तसेच सांडपाणी निच-याची व्‍यवस्‍था यासाठी सरकार प्रयत्‍न करेल.

(iv) सार्वत्रिक आरोग्‍य व्‍यवस्‍थेसाठी सरकार प्रयत्‍न करेल.

(v) पाळणाघरांची व्‍यवस्‍था सार्वत्रिकपणे अंमलात यावी, यासाठी सरकार प्रयत्‍न करेल.

(vi) 14-18 वयोगटातील किशोरवयीन मुलींना घरी घेऊन जाता येणारा कोरडा शिधा आणि / अथवा ताजे शिजवलेले अन्‍न तसेच आरोग्‍य, पौष्टिकता व शिक्षण यांच्‍या सोयी सार्वत्रिक होतील, यासाठी सरकार प्रयत्‍न करेल.

(vii) जीवनसत्‍व अ, आयोडिन आणि लोह यांची पूरकव्‍यवस्‍था सार्वत्रिक व्‍हावी, यासाठी सरकार प्रयत्‍न करेल.

(viii) एचआयव्‍ही/एड्स, कुष्‍ठरोग आणि क्षय यांसारखे गंभीर आजार झालेल्‍यांना खास पूरक पौष्टिक आहाराची व्‍यवस्‍था करण्‍यासाठी सरकार प्रयत्‍न करील.

(ix) जबाबदार प्रौढ संरक्षणापासून वंचित अशा गरजवंत मुलांसाठी निवासी शाळा सुरु करण्‍याचा सरकार प्रयत्‍न करेल.

(x) वृद्ध, अपंग आणि एकल महिला यांना पुरेशी पेन्‍शन मिळावी यासाठी सरकार परिणामकारक पावले उचलेल. या पेन्‍शनचे दर अकुशल कामगारासाठीच्‍या कायदेशीर किमान वेतनाच्‍या खाली असता कामा नये.

भाग II:

अंमलबजावणी यंत्रणा व पारदर्शिता

(इथल्‍या प्रस्‍तावनेच्‍या 3 परिच्‍छेदांचा अनुवाद केलेला नाही)

.

1. तक्रार निवारण व देखरेख (Grievance Redressal and Monitoring)

तालुका लोक सुविधा केंद्र (Block People’s Facilitation Centre): प्रत्‍येक तालुक्‍यात अशा सुविधा पुरविण्‍याचे कौशल्‍य असलेली बिगरसरकारी व्‍यक्‍ती अथवा गट यांची विशेष सेवा पुरवठादार (special service provider) म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात येईल. अन्‍याय झालेली कोणीही व्‍यक्‍ती इथे आल्‍यास तिला तक्रार कशी नोंदवावी, अपील कसे करावे, तक्रारीचा पाठपुरावा कसा करावा यासंबंधीचे मार्गदर्शन व मदत केली जाईल.

जिल्‍हा देय अधिकार (एन्‍टायटलमेंट) अधिकारी (District Entitlements Officer): विविध व्‍याव‍सायिकांमधून निवडलेल्‍या तरुणांना ही जबाबदारी देण्‍यात येईल. विद्यापीठातील प्राध्‍यापक, वकील, डॉक्‍टर्स, खाजगी क्षेत्रामधले मॅनेजर तसेच जे सार्वजनिक सेवेसाठी वेळ देऊ इच्छित असतील अशांमधून ही निवड करण्‍यात येईल. या पदावरील त्‍यांचा कालावधी 5 वर्षांचा असेल. त्‍यांना या कायद्यातील अधिकारांची अंमलबजावणी करण्‍याचा, तपासणी करण्‍याचा तसेच दंड व भरपाईद्वारा तक्रारींचे निवारण करण्‍याचा अधिकार असेल.

राष्‍ट्रीय आणि राज्‍य आयुक्‍त (National and State Commissions): निवड समितीमार्फत यांच्‍या नेमणुका होतील. अर्ज अथवा नावे मागवणे, त्‍यांचे वस्‍तुनिष्‍ठ मूल्‍यांकन करणे या बाबी पारदर्शकपणे व सार्वजनिकरित्‍या केल्‍या जातील. हे आयुक्‍त अपीलांची सुनावणी घेतील, कायद्यातील अधिकारांत मोडणा-या योजनांच्‍या अंमलबजावणीचे मूल्‍यांकन व देखरेख करतील.

6 दंड आणि भरपाई (Fines and Compensation)

या कायद्यात यासाठीचे अधिकार जिल्‍हा एन्‍टायटलमेंट अधिकारी तसेच राज्‍य व केंद्रिय आयोगांना देण्‍यात आले आहेत.

कायदा असे प्रस्‍तावित करतो की, या कायद्यात अंतर्भूत असलेल्‍या योजनांच्‍या चोख अंमलबजावणीसाठी विविध पातळ्यांवरील (स्‍थानिक, राज्‍य व केंद्र) सार्वजनिक अधिकारयंत्रणांना आरोपी करण्‍यात यावे. हे सरकारी अधिकारी कायद्याचे उल्‍लंघन करत असतील तर त्‍यांना दंड करण्‍यात यावा. (हे दंड गुन्‍हेगारी तसेच नागरी दोन्‍ही प्रकारचे असतील) केवळ कनिष्‍ठ नव्‍हे तर वरिष्‍ठ अधिका-यांनाही या कायद्याने दंड होईल, याची दक्षता घेतली जाईल. तोच गुन्‍हा परत परत झाल्‍यास दंडाची तीव्रताही त्‍याप्रमाणे वाढत जार्इल.

दंड ही त्‍या अधिका-याची व्‍यक्तिगत जबाबदारी असेल. याव्‍यतिरिक्‍त सरकारही ज्‍याच्‍या अधिकाराचे हनन झालेले आहे अशा व्‍यक्‍तीला अथवा गटाला भरपाई देण्‍यास जबाबदार असेल. ही भरपाई उल्‍लंघित अधिकाराच्‍या रोख किंमतीच्‍या 3 पट इतकी असेल..

7 पारदर्शकता व सामाजिक लेखापरीक्षण (Transparency and Social Audit)

1. या कायद्याची सर्व माहिती सार्वजनिकरित्‍या उपलब्‍ध असेल याची दक्षता घेतली जाईल.

2. सर्व सरकारी अधिका-यांनी स्‍वतःहून माहिती उपलब्‍ध करावी, यासंबंधीच्‍या प्रकियेचा आराखडा निश्चित करण्‍यात येईल.

3. प्रत्‍येक लाभार्थ्‍याला त्‍याचा लाभ मिळावा अथवा नाकारला गेला याची नोंद, लाभ देतानाचा पुरावा, तारीख, वेळ इ. संबंधीचा पारदर्शक आराखडा तयार करण्‍यात येईल.

4. ऑनलाईन देखरेख व माहिती यंत्रणा व जनता माहिती यंत्रणा ह्या जोडण्‍यात येतील.

5. खुली तपासणी, खुले रेकॉर्ड, खुले कार्यालय व खुली निर्णयप्रकिया यांना परवानगी देण्‍यात येईल.

6. मगितलेल्‍या माहितीच्‍या प्रती 15 दिवसांत देणे.

7. माहितीच्‍या प्रती देताना झेरॉक्‍सच्‍या दरापेक्षा जास्‍त दर लावता कामा नये.

8. अशी माहिती देण्‍यासाठी टाळाटाळ करणे म्‍हणजे दंडाला पात्र होणे, याची नोंद देण्‍याची दक्षता घेणे.

9. सामाजिक लेखापरीक्षण किंवा सामाजिक दक्षता यांसाठीचे नोंदणी नमुने लोकांना समजतील, असे असावेत, याची दक्षता घेणे.

10. पारदर्शितेचे मापदंड पाळण्‍यासाठी जो प्रशासकीय खर्च येतो, त्‍यासाठी जो निधी राखून ठेवलेला असतो त्‍याचा वापर करावा. दुस-या शब्‍दांत सांगायचे म्‍हणजे, बहुसंख्‍य प्रकरणात माहिती मागणा-याला माहिती अधिकाराचा वापर करावा लागू नये.

8 खर्चाची विभागणी (Cost Sharing: Provisional Formulation)

केंद्र सरकार रेशन तसेच रेशनेतर योजनांसाठी पुरेशा प्रमाणात व वेळेवर धान्‍याचा पुरवठा करेल.

रेशन: प्राधान्‍य व सर्वसाधारण गटासाठीचे धान्‍य व त्‍याचे दुकानापर्यंतचे वितरण यासाठीचा खचे केंद्र सरकार करेल.

राज्‍यांकडून होणारी विकेंद्रित धान्‍यखरेदी तसेच साठवणूक व वितरण यासाठीचा खर्च केंद्रसरकार राज्‍यांना देईल. त्‍यासाठीची मार्गदर्शक तत्‍त्‍वे निश्चित करण्‍यात येतील.

इतर सर्व बिगर रेशन व बिगर पौष्टिकतासंबंधित योजनाः यासाठीच्‍या खर्चाच्‍या विभागणीचे गुणोत्‍तर केंद्र व राज्‍य सरकारे यांमध्‍ये 1 एप्रिल 2010 ला लागू असलेले अथवा 70:30 यापैकी जे अधिक असेल ते वापरले जाईल.

प्रशासकीय खर्चः या व्‍यतिरिक्त तक्रार निवारण आणि देखरेख व्यवस्‍था मजबूत करण्‍यासाठी केंद्र सरकार प्रशासकीय खर्चासाठी म्‍हणून 6 टक्‍के इतका वाटा उचलेल.

9 पारदर्शिता आणि सामाजिक लेखापरीक्षण (Transparency and Social Audit)

हा कायद्याने नियमित सामाजिक लेखापरीक्षण बंधनकारक केलेले आहे. प्रत्‍येक योजनेचे प्रत्‍येक पातळीवरील सामाजिक लेखापरीक्षण व त्‍याचे स्‍वरुप निश्चित करण्‍यात येर्इल. हे लेखापरीक्षण स्‍वतंत्र यंत्रणेकडून करण्‍यात येईल. यातून आढळलेली माहिती जिल्‍हा एंटायटलमेंट यंत्रणेला पुढील उचित कार्यवाहीसाठी कळवली जाईल. यातून वस्‍ती पातळीवरील देखरेखी(community based monitoring)साठीचा तसेच दर्जा, अंमलबजावणी, वित्‍तीय खर्च, सेवा आणि अधिकार या कायद्यात अंतर्भूत बाबींच्‍या सहभागी लेखापरीक्षणाचा आराखडा तयार होऊ शकेल.


परिशिष्‍ट 1: रेशनविषयक अधिकारांसाठीचे अन्‍नधान्‍य आणि आर्थिक तरतुदीचे अंदाजपत्रक

Foodgrain and Budget Requirements of PDS Entitlements

पहिला टप्‍पा

अंतिम टप्‍पा

1

प्रति कुटुंब अधिकार (मासिक)

प्राधान्‍य

35 किलो

35 किलो

सर्वसाधारण

20 किलो

20 किलो

व्‍यक्तिगत अधिकार (मासिक)

प्राधान्‍य

7 किलो

7 किलो

सर्वसाधारण

4 किलो

4 किलो

2

समाविष्‍ट लोकसंख्‍या

72%

78%

ग्रामीण

85%

90%

शहर

40%

50%

ग्रामीण

85%

90%

प्राधान्‍य

46%

46%

सर्वसाधारण

39%

44%

शहर

40%

50%

प्राधान्‍य

28%

28%

सर्वसाधारण

12%

22%

3

उचल

85%

90%

4

धान्‍याची गरज (दशलक्ष टन)

रेशनa

49.4

55.6

अन्‍यb

8

8

एकूण

57.4

63.6

5

एकूण अनुदान (रु. कोटी)c

71,837

79,931

6

अतिरिक्‍त अनुदान (रु. कोटी)

(सध्‍याच्‍या रु. 56,700 कोटी अनुदानाच्‍या व्‍यतिरिक्‍तचे)

15,137

23,231

a Assuming a population of 118.61 crores (or 23.7 crore households) based on population projections for 1st October 2010.

b Including 3.5mn MTs for Mid Day Meal Scheme, 2mn MTs for ICDS, 0.5mn MTs for welfare hostels and 2mn MTs for natural calamities.

c Based on: (1) Issues prices of Rs 3/2/1/ for rice/wheat/millets for Priority households, and 50% of MSP for General households (MSPs: Rs. 15.37 per kg for rice and Rs. 11 per kg for wheat); (2) "Economic cost" of Rs. 20.43 per kg for rice and Rs, 15.46 per kg for wheat, and rice-wheat ratio of 60:40. All figures at 2010-11 prices.


परिशिष्‍ट 2: प्राधान्‍य गटांचा किमान समावेश (Minimum Coverage of Priority Groups)

राज्‍य

ग्रामीण गरिबीचे गुणोत्‍तर (%)

प्राधान्‍य गटांचा किमान समावेश

(तेंडुलकर समितीचा अंदाज 2004-5 साठी)

अनु.जाती/जमातीa च्‍या ‘आपोआप समावेशा’शिवाय

W अनु.जाती/जमातीb च्‍या ‘आपोआप समावेशा’सह

SC/STs

Others

All

आंध्र प्रदेश

47.5

26.4

32.3

35.5

46.1

बिहार

77.2

49.0

55.7

61.3

57.9

छत्‍तीसगढ

60.5

49.6

55.1

60.6

74.3

गोवा

26.0

28.2

28.1

30.9

29.4

गुजरात

54.3

32.0

39.1

43.0

51.4

हरयाणा

47.1

16.1

24.8

27.3

34.0

हिमाचल प्रदेश

38.8

18.4

25.0

27.5

42.8

जम्‍मू आणि काश्‍मीर

15.2

13.9

14.1

15.5

33.0

झारखंड

60.7

44.8

51.6

56.8

68.8

कर्नाटक

55.4

30.3

37.5

41.3

45.0

केरळ

34.6

18.0

20.2

22.2

28.1

मध्‍य प्रदेश

72.8

38.5

53.6

59.0

63.9

महाराष्‍ट्र

69.5

39.3

47.9

52.7

54.1

ओरिसा

77.7

47.9

60.8

66.9

69.7

पंजाब

38.4

11.1

22.1

24.3

40.5

राजस्‍थान

53.2

25.6

35.8

39.4

50.5

तामिळनाडू

51.2

32.3

37.5

41.3

49.5

उत्‍तर प्रदेश

56.3

38.0

42.7

47.0

52.5

उत्‍तरांचल

43.4

31.8

35.1

38.6

47.9

प. बंगाल

40.9

36.6

38.2

42.0

56.0

अरुणाचल प्रदेश

29.6

46.6

33.6

37.0

84.0

आसाम

34.4

37.2

36.4

40.0

49.9

मणिपूर

55.4

25.0

39.3

43.2

59.3

मेघालय

14.8

1.4

14.0

15.4

90.7

मिझोराम

23.0

22.5

23.0

25.3

97.1

नागालँड

8.8

48.4

10.0

11.0

96.8

सिक्‍कीम

35.9

28.4

31.8

35.0

47.1

त्रिपुरा

49.1

39.8

44.5

49.0

72.1

संपूर्ण भारत

56.5

35.1

41.8

46.0

53.5

a Rural poverty ratio in 2004-5, plus margin of 10% for exclusion errors.

b In this column, the minimum coverage provides for all poor households and all SC/ST households.