Wednesday, September 23, 2009

आघाडीचे सूत्र


कम्‍युनिस्‍ट विचारप्रणाली व कम्‍युनिस्‍ट पक्ष संघटना ही समाजातील अन्‍य पुरोगामी विचारप्रणालींची व त्‍यावर आधारुन समाजकार्य करणा-या संघटनांची व व्‍यक्‍तींची स्‍पर्धक नाही. ती त्‍यांची मित्रशक्‍ती आहे. जेथे जेथे असे क्रम, मग ते समाज विभागाच्‍या रुपाने असो, संघटनेच्‍या वा संघटनेतील एखाद्या प्रवाहाच्‍या रुपाने असो, दृगोचर होऊ लागतात, तेथे तेथे ते हेरुन त्‍यांच्‍याशी त्‍यांच्‍याशी आपल्‍या स्‍वतःच्‍या विचारसरणीच्‍या, धोरणाच्‍या व वर्गनिष्‍ठेच्‍या आत्‍मविश्‍वासाने तसेच आपापल्‍या परिस्थितीत आपापल्‍या जाणीवेच्‍या पातळीप्रमाणे इतर जे पुरोगामी दिशेने धडपडत असतील त्‍यांच्‍या प्रयत्‍नांबद्दल आदरभाव बाळगून त्‍यांच्‍याशी क्रांतिकारक नम्रतेने संबंध जोडण्‍याचे आणि क्रांतिकारक शक्‍ती संघटितपणे उभ्‍या करण्‍याच्‍या महान कार्यात त्‍यांचे जे काही सहाय्य होऊ शकत असेल ते घेण्‍याचा प्रयत्‍न करण्‍याची व त्‍याचवेळी त्‍यांच्‍या पाठीमागील समुदायांशी प्रत्‍यक्ष चळवळीचे तसेच वैचारिक संबंध बांधण्‍याचे बाबतीत कुठलाही संकोच न करण्‍याची अथवा बंधन न स्‍वीकारण्‍याची नवजीवन संघटनेची भूमिका राहिली आहे. या भूमिकेमुळेच निरनिराळ्या चळवळींतील अनेक कार्यकर्ते आज आपल्‍या पक्षात आहेत. अशा प्रकारच्‍या शक्‍तींशी मध्‍यमवर्गीय स्‍पर्धेच्‍या पद्धतीने वागण्‍याची, त्‍यांच्‍या उणिवांवर भर देऊन त्‍यांचा पाणउतारा करण्‍याची व त्‍यांचा वैचारिक संघटनात्‍मक मोड करुन अथवा आमिष देऊन त्‍यांना आपल्‍या वर्चस्‍वाखाली आणण्‍याची जी संयुक्‍त आघाडीच्‍या व्‍यवहाराला घातक ठरणारी रीत कम्‍युनिस्‍ट पक्षाच्‍या पुढारी कार्यकर्त्‍यांनी रुढ केली होती, त्‍यापासून वेगळी, आंतरराष्‍ट्रीय कम्‍युनिस्‍ट चळवळीची खरीखुरी संयुक्‍त आघाडी बांधण्‍याची रीत ही कॉ. एस. कें. ची या भूमीतील कम्‍युनिस्‍ट चळवळीला खास वैयक्तिक देणगी आहे, असे म्‍हटले तर अति‍शयोक्‍ती होणार नाही. हिंदुस्‍तानसारख्‍या परतंत्र मागास देशात पुरोगामित्‍वाचा मक्‍ता फक्‍त कम्‍युनिस्‍टांकडे नाही. देशातील सर्व पुरोगामित्‍वाचे संकलन करण्‍याची जबाबदारी कम्‍युनिस्‍टांची आहे. कम्‍युनिस्‍ट विचारसरणीचे जे शास्‍त्रीयत्‍व व जी मौलिकता आहे, त्‍यामुळे सर्व पुरोगामित्‍वाचा पुढाकार कम्‍युनिस्‍ट आंदोलनाकडे येणे अपरिहार्य आहे. परं‍तु, तो त्‍यांनी आपल्‍या कार्याने व सर्वांच्‍या मान्‍यतेने मिळवला पाहिजे. संघटनात्‍मक अथवा अन्‍य क्‍लृप्‍त्‍या करुन बळकावता कामा नये. तसा तो कधीच बळकावता येत नाही. याबाबतीत घाई करुन चालत नाही. धिमेपणाने व्‍यवहार करावा लागतो, ही व्‍यावहारिक शिकवणसुद्धा व्‍यक्तिशः कॉ. एस. कें.चीच आहे. नवजीवन संघटनेच्‍या व नंतर लाल निशाण कार्यकर्त्‍यांच्‍या व्‍यवहारात इतर सर्वांच्‍या स्‍पर्धाशील व्‍यवहाराच्‍या पार्श्‍वभूमीवर उठावाने दिसणा-या पद्धती आजसुद्धा उपयुक्‍त आहेत आणि त्‍या काटेकोरपणे अवलंबल्‍या पाहिजेत. नवीन येणा-या कार्यकर्त्‍याला जुन्‍यांनी शिकविल्‍या पाहिजेत. म्‍हणून हा खास उल्‍लेख आहे.

(कॉ. यशवंत चव्‍हाण, पक्षांतर्गत विचारविनिमय, 1979, पान 69-70)

रिडालोसला लाल निशाण पक्षाचे पत्र

लाल निशाण पक्ष

श्रमिक, रॉयल क्रेस्‍ट, लो. टिळक वसाहत गल्‍ली क्र.3, दादर, मुंबई- 400014. फोनः022-24102180


11 सप्‍टेंबर 2009

प्रिय मा. रामदासजी आठवले,

निमंत्रक,

रिपब्लिकन डावी लोकशाही समिती

महाराष्‍ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु झाली आहे. आपल्‍या पुढाकाराने रिपब्लिकन, डाव्‍या, समाजवादी विचारसरणीच्‍या तसेच अन्‍य अनेक पक्षांची रिपब्लिकन डावी लोकशाही समिती स्‍थापन झाली आहे. समितीतले आपण सगळे जण जागावाटपाच्‍या अत्‍यंत किचकट व प्रचंड घाईच्‍या कामात सध्‍या व्‍यग्र आहात. अशा व्‍यग्रतेतून वेळ काढून आपण आमचे हे पत्र वाचाल, अशी अपेक्षा आहे.

ही समिती स्‍थापन करताना ही एकजूट केवळ विधानसभा निवडणुकांपुरती राहणार नसून त्‍यानंतरही कष्‍टकरी-दलितांच्‍या प्रश्‍नावर कार्यरत राहणार असल्‍याचे आपण जाहीर केले आहे. तसेच संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या आंदोलनात एकत्र असलेले आम्‍ही लोक पुन्‍हा एकत्र येऊन संयुक्‍त महाराष्‍ट्राच्‍या आंदोलनाला अपेक्षित असलेला परंतु अपुरा राहिलेला कार्यक्रम पुढे नेणार आहोत, असेही आपण व्‍यक्‍त केले आहे. आपल्‍या या भूमिकेचे आम्‍ही मनःपूर्वक स्‍वागत करतो व निवडणुकांनंतर आपल्‍या पुढाकाराखाली होणा-या यासंबंधीच्‍या आंदोलनाचा सक्रीय भाग होण्‍याची इच्‍छाही प्रदर्शित करतो.

महाराष्‍ट्र राज्‍य निर्मितीला पुढील वर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईसह महाराष्‍ट्रासाठी जी संयुक्‍त महाराष्‍ट्र समिती बनविण्‍यात आली होती, त्‍यात सोशालिस्‍ट पार्टी, कम्‍युनिस्‍ट पार्टी तसेच शेड्युल्ड कास्‍ट फेडरेशन, शेतकरी कामगार पक्ष हे मुख्‍य घटक होते. कॉ. डांगे व साथी एस.एम. जोशी यांच्‍या सहकार्याच्‍या रुपाने कम्‍युनिस्‍ट व सोशालिस्‍टांची एकजूट घडविण्‍यात लाल निशाण पक्षाने कॉ. दत्‍ता देशमुखांच्‍या रुपाने महत्‍वाची भूमिका बजावली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीला पाठिंबा द्यावा, अशी विनंती करण्‍यासाठी समितीतर्फे दत्‍ता देशमुख, क्रांतिसिंह नाना पाटील, एस.के. लिमये हीच मंडळी गेली होती. बाबासाहेबांनी शिष्‍टमंडळाचे प्रेमाने स्‍वागत केले आणि ते म्‍हणाले, संयुक्‍त महाराष्‍ट्राला माझा संपूर्ण पाठिंबा आहेच. आणि पुढे त्‍यांनी दत्‍ता देशमुख व नाना पाटलांचा हात हातात घेऊन, आपुलकीने पण खोचकपणे विचारले, संयुक्‍त महाराष्‍ट्र राज्‍य होईल तेव्‍हा तुम्‍ही मराठे (सत्‍तेवर) याल, त्‍यावेळी माझ्या दलित जनतेशी कसे वागणार?’ दत्‍ता व नाना पाटील या दोघांनी तळमळीने उत्‍तर दिले, कधीही अंतर देणार नाही.

57 च्‍या निवडणुकीत बी.सी. कांबळे व दा.म.शिर्के या दोघांना कॉ. दत्‍ता देशमुख व कॉ. संतराम पाटील यांनी साथीला घेऊन बरोबरीची मते मिळवून विजयी होण्‍यात सहाय्य केले. समितीत जागावाटपांवरुन मतभेद सुरु झाले तेव्‍हा, प्रसंगी आम्‍हाला एकही जागा देऊ नका, पण एकजूट टिकवा, ती मोडाल, तर सर्व पडाल, असा इशारा दत्‍ता देशमुखांनी दिला होता. एकमताने लाल निशाण पक्षाच्‍या वाट्याला आलेल्‍या आठही जागा त्‍यावेळी निवडून आल्‍या. त्‍यात त्‍यावेळच्‍या संयुक्‍त मतदारसंघ पद्धतीत कांबळे व शिर्के उभे असलेल्‍या अनुक्रमे नगर व कोल्‍हापूर या जागांचा समावेश होता.

मुंबईसह संयुक्‍त महाराष्‍ट्र मिळविण्‍यात मराठी जनता यशस्‍वी झाली. दिल्‍लीहून महाराष्‍ट्राचा मंगल कलश घेऊन आलेल्‍या यशवंतराव चव्‍हाणांनी केलेल्‍या आवाहनाला मान देऊन शेतकरी कामगार पक्षाचे मातब्‍बर पुढारी शहरी, ग्रामीण नवधनिकांच्‍या वर्चस्‍वाखाली गेलेल्‍या कॉंग्रेसमध्‍ये सामील झाले. वैचारिक मतभेदांचे निमित्‍त करुन समाजवादी व कम्‍युनिस्‍ट आपापल्‍या मूळ छावण्‍यांत परतले. मुंबईसह महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेनंतरच्‍या पहिल्‍या सार्वत्रिक निवडणुकीत 62 साली संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचा प्रचंड पराभव झाला. महाराष्‍ट्रावर शहरी व ग्रामीण धनिकांचे वर्चस्‍व प्रस्‍थापित झाले. ते आजतागायत आहे. मुंबईवरील बडे भांडवलदार, बिल्‍डर व व्‍यापारी यांचे प्रभुत्‍व दिवसेंदिवस वाढतेच आहे. कामगार-शेतकरी एकजुटीचा प्रभाव आणि दबाव महाराष्‍ट्र सरकारच्‍या धोरणावर पाडण्‍याचे संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचे उद्दिष्‍ट विफल झाले आहे. अन्‍यायाने महाराष्‍ट्राबाहेर ठेवण्‍यात आलेल्‍या बेळगाव, निपाणी, बिदर हे मराठीबहुल भाग अजूनही आपण मराठी राज्‍यात समाविष्‍ट करु शकलेलो नाही.

आम्ही लाल निशाण पक्ष गेली 20 वर्षे देशाच्‍या राजकारणाचा विचार करताना, धर्मांध झोटिंगशाही राजकारणाला विरोध करण्‍यासाठी कॉंग्रेससह सर्व सर्वधर्मसमभाव मानणा-या पक्षांच्‍या एकजुटीचे प्रवक्‍तेपण सातत्‍याने करीत आहोत. केंद्रातील संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारच्‍या काही धोरणाबाबत आमची तीव्र टीका असतानाही व त्‍याच्‍या विरुद्ध लोकांना निःसंकोचपणे संघटित करत असतानाही, अखिल भारतीय पातळीवर कॉंग्रेससह व्‍यापक लोकशाही आघाडी करण्‍याच्‍या धोरणात बदल करण्‍याची वेळ आली आहे, असे वाटत नाही.

मात्र महाराष्‍ट्रातील कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडी सरकारचा व्‍यवहार हा असंवेदनशील, ग्रामीण व शहरी सधनांचे हितरक्षण करणारा व केंद्र सरकारने घेतलेल्‍या जनस्‍वी भूमिका व योजना अंमलात आणण्‍याबाबत दुर्लक्ष करणारा, महाराष्‍ट्राचा मोठा भाग असलेल्‍या दुष्‍काळी व कोरडवाहू शेतीकडे गुन्‍हेगारी दुर्लक्ष करणारा आहे.

अशावेळी खरे पाहता, संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीचे पुनरुज्‍जीवन व्‍हावे, ही काळाची गरज आहे. महाराष्‍ट्राचा कामगार वर्ग आज फारच दुर्बल झाला आहे. समितीचा मुख्‍य आधार असलेला मुंबईचा गिरणी कामगार, गिरणी मालक आणि सरकार यांनी संगनमताने नेस्‍तनाबूत केला आहे. संघटित क्षेत्रातील इतर कामगार पक्षीय संघटनात्‍मक फुटीमुळे राजकीय दृष्‍ट्या प्रभावशून्‍य बनला आहे. असंघटित क्षेत्रातील संख्‍येने अफाट वाढलेला कामगार विस्‍कळीत आहे. खेडोपाडीचा भूमिहीन शेतमजूर, गरीब शेतकरी, आदिवासी सधनांच्‍या वर्चस्‍वाखाली आहे.

प्रत्‍येक धंद्यात एक संघटना व सर्व धंद्यातील कामगारांच्‍या वर्गीय एकजुटीची एकच एक केंद्र संघटना, तसेच प्रत्‍येक खेड्यात भूमि‍हीन शेतमजूर, गरीब शेतकरी यांच्‍या एकजुटीच्‍या संघटना व्‍हायला हव्‍यात. श्रमिकांच्‍या या संघटनांबरोबरच सामाजिक अत्‍याचारांना तोंड देणा-या आदिवासी, दलित व महिला या समाजविभागांकडे अग्रक्रमाने लक्ष द्यायला हवे. याचबरोबर आरोग्‍य, शिक्षण व अन्‍य नागरी तसेच सांस्‍कृतिक प्रश्‍न हाती घ्‍यायला हवेत. संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीने या भूमिका घेतल्‍या होत्‍या. त्‍यामुळे समितीला सामर्थ्‍य प्राप्‍त झाले होते. पण समिती विसर्जित झाली आणि त्‍या भूमिकाही उधळल्‍या गेल्‍या. या जनस्‍वी भूमिकांचा आज एकजुटीने पुरस्‍कार अत्‍यंत निकडीचा आहे. म्‍हणूनच पुरोगामी संपूर्ण संयुक्‍त महाराष्‍ट्र समितीच्‍या रुपात पुनरुज्‍जीवन आम्‍हाला समयोचित वाटते.

निवडणुकीनंतर या विभागांच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने जो आंदोलनाचा कार्यक्रम ठरवावयास आपण बसाल, त्‍यावेळी आम्‍हाला आपण निमंत्रित कराल, ही अपेक्षा आहे.

आपल्‍याला मनःपूर्वक शुभेच्‍छा !

आपला भ्रातृभावपूर्वक,

(कॉ. यशवंत चव्‍हाण)

Tuesday, June 2, 2009

30 मे 2009 च्‍या लोकसत्‍तेतील राणी दुर्वे यांच्‍या लेखावर ईमेलने दिलेली प्रतिक्रिया

प्रिय राणी दुर्वे,

सप्रेम नमस्‍कार.

तुमचा 'नौतपा आणि फुआर'हा लेख ('लेख'हा शब्‍द तसा रुक्षच आहे,निसर्गचित्र, निसर्गशिल्‍प, शब्‍दशिल्‍प असे काही तरी मला म्‍हणायचे आहे) खूप आवडला. नित्‍याच्‍या वर्तमानपत्री वाचनाच्‍या 'नौतपा'नंतर अशी 'फुआर'क्वचितच चिंब करते.

तुम्‍ही उल्‍लेखिलेली मुंबईची कधीकाळची थंडी मीही लहानपणी अनुभवली आहे. 'मुंबईची संस्‍कृती सपाट व्‍यक्तिमत्‍वहीन होत गेली तसे तिथले ऋतूही व्‍यक्तिमत्‍व हरवत गेले की काय न कळे.'असे मलाही वाटते. मुंबईच्‍या बाहेर गेले की तिथल्‍या कडाक्‍याच्‍या उन्‍हाच्‍या झळा आणि गोठवणारी थंडी यांचेही विलक्षण अप्रूप, असोशी वाटते. त्‍या प्रदेशांना आपले एक खास 'व्‍यक्तित्‍व'असते, हेच बहुधा त्‍याचे कारण असावे.

अलिकडे दुर्मिळ झालेली चांगली मराठी कानावर आली, वाचायला मिळाली की अशीच 'फुआर'अनुभवास येते. तुमच्‍या भाषेचे लालित्‍य मोकळ्या माळावर अवचित गाठणा-या श्रावणसरींची आठवण देऊन गेले. विशेषतः शेवटून तिस-या परिच्‍छेदातील 'नौतपा संपेल, त्‍या दिवशी......अवघा ताप निवून जातो.'या ओळी अप्रतिम. रोमांचित करत अखेर उन्‍मनी अवस्‍था प्रदान करणा-या.

भाषेच्‍या समृद्धीसाठी इंग्रजीप्रमाणे नामांची क्रियापदे मराठीत का करु नयेत, उदा. 'ग्रंथ'वरुन 'ग्रंथणे', असे मत कुसुमाग्रजांनी व्‍यक्‍त केल्‍याचेकोठेतरी वाचले होते. तारांबळू, केकावणे, शांतवले...हे तुमचे शब्‍दप्रयोग समर्पक, अर्थवाही तसेच मराठीला श्रीमंत करणारे.

मी तसे तुमचे दोन-तीनच लेख वाचले आहेत. (अर्थात, ही माझी मर्यादा. एकूणच ललित लेखन वाचणे हा प्राधान्‍याचा भाग नसल्‍याने असेल.) तुमच्‍या इतर लेखनात अजून कितीतरी अशी सौंदर्यस्‍थळे असतील.

वातावरणातल्‍या अन् मनातल्‍याही 'नौतपा'ला काही काळ तुमची फुआर रिमझिमवून गेली. त्‍याबद्दल आपल्‍या लेखणीला धन्‍यवाद.

...अन् अर्थातच मनःपूर्वक शुभेच्‍छाही!

आपला,

सुरेश सावंत,एक वाचक

Thursday, May 28, 2009

रमाबाई कॉलनी हत्‍याकांडाचा निकाल आणि माझी अस्‍वस्‍थता



खैरलांजीच्‍या निकालापाठोपाठ रमाबाई कॉलनीतील गोळीबाराच्‍या खटल्‍याचा निकालही आश्‍वासक लागला. आंबेडकरी समुदायाच्‍या आपल्‍याला न्‍याय मिळत नाही, या वेदनेवर ही एक फुंकर होती.
रमाबाई कॉलनीत 11 जुलै 97 रोजी पोलिसांच्‍या गोळीबारात 10 माणसे हकनाक मेली. राजावाडी हॉस्पिटलमधील एका खोलीत ठेवलेली ती प्रेते आताही माझ्या डोळ्यासमोर आहेत. त्‍यात पुरुष, स्त्रिया आणि मुलेही होती. ते दृश्‍य विलक्षण अस्‍वस्‍थ करणारे होते. त्‍या निष्‍पाप जीवांच्‍या घरच्‍यांचा टाहो, आंबेडकरी चळवळीची विकलता आणि प्रगतीलशील चळवळींची विफलता यांचा संकलित परिणाम ही अस्‍वस्‍थता गडद करत होता. एका असहाय्यतेच्‍या भयानक, खोल दरीत आपण कोसळत आहोत, अशी मनःस्थिती झाली होती. पुढे 10 वर्षांनी 29 सप्‍टेंबर 2006 सालच्‍या खैरलांजीच्‍या निर्घृण हत्‍याकांडाचा अंगावर काटा आणणारा वृत्‍तांत कळल्‍यावरही हीच अवस्‍था मी अनुभवली. सगळ्या प्रसारमाध्‍यमांत बराच काळ गाजल्‍यामुळे या दोन घटना आपल्‍या सगळ्यांच्‍या ठळकपणे लक्षात आहेत. गवई बंधूंचे डोळे काढणे, पोचीराम कांबळेला जिवंत जाळणे याही घटना अशाच गाजलेल्‍या. पण खूप वर्षांपूर्वीच्‍या. अशी प्रसिद्धी न मिळणा-या दलित अत्‍याचाराच्‍या घटना आजही घडत आहेत. त्‍यांचे वर्णन ऐकले की तीच असहाय्यतेची भावना मन व्‍यापते.

ज्‍याने गोळीबार केला त्‍या मनोहर कदम या पोलीस अधिका-याला जन्‍मठेपेची शिक्षा न्‍यायालयाने ठोठावली. तब्‍बल 12 वर्षांनी. अगदी अलिकडेपर्यंत आरोपी मनोहर कदम पोलीस सेवेत होते. ज्‍यावेळी गोळीबार झाला तेव्‍हा, भाजप-सेनेचे युतीचे सरकार होते. गृहमंत्री असलेल्‍या गोपिनाथ मुंडेंनी मनोहर कदम यांच्‍या कृतीचे त्‍यावेळी जोरदार समर्थनच केले होते. त्‍यानंतर आलेल्‍या कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या सरकारने मनोहर कदमना सेवेत कायम ठेवले. एवढेच नव्‍हे, तर बढतीही दिली. सत्‍तेच्‍या जवळ आणि विरोधात असलेल्‍या काही आंबेडकरी नेत्‍यांना रमाबाई कॉलनीतील जनतेने हत्‍याकांडानंतर आपल्‍या वस्‍तीतून धक्‍के मारुन हाकलले होते, तर उरलेले नेते जनतेच्‍या या उद्रेकाला घाबरुन तिकडे फिरकलेच नाहीत. पुढे हे नेते मधून मधून हा प्रश्‍न उच्‍चारत राहिले. पण कोणीही ठोसपणे त्‍याचा पाठपुरावा केला नाही. त्‍यांचे सत्‍ताकारणाचे नित्‍यकर्म कोठेच खोळंबले नाही. या नेत्‍यांना हाकलणारी जनताही पुढे नाराजीने, नाईलाजाने का होईना, पण याच नेत्‍यांच्‍या कळपात कोठे ना कोठे सामील होत राहिली. संघराज रुपवते, श्‍याम गायकवाड यांसारख्‍या काही मोजक्‍या मंडळींनी रमाबाईच्‍या खटल्‍याचा नियमित पाठपुरावा केला, त्‍यामुळेच खरे तर हा आश्‍वासक निकाल लागू शकला.
आज निकालानंतरही माझी अस्‍वस्‍थता कायम आहे. एक शल्‍य आत डाचत राहते आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीच्‍या संकल्‍पनेविषयी एक खुले पत्र त्‍यांच्‍या अखेरच्‍या काळात लिहायला सुरुवात केली होती. त्‍यांच्‍या महापरिनिर्वाणामुळे त्‍या पत्रात ते समग्र मांडणी करु शकले नाहीत. लोकशाहीच्‍या रक्षणासाठी सत्‍ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्‍यासाठी प्रबळ विरोधी पक्षाची नितांत आवश्‍यकता असते, या धारणेतून रिपब्लिकन पक्षाची जुळवाजुळव करण्‍याचा त्‍यांचा मानस होता. हा पक्ष अर्थातच एकजातीय नव्‍हता, तो सर्वसमावेशक असाच असणार होता. एस.एम. जोशी, लोहिया आदिंशी तशी त्‍यांनी बोलणीही सुरु केली होती. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि ही बोलणीही तिथेच थांबली. पुढे बाबासाहेबांच्‍या अनुयायांनी रिपब्लिकन पक्ष स्‍थापन केला. स्‍थापनेनंतर लगेचच त्‍याच्‍या चिरफळ्या झाल्‍या. आंबेडकरी चळवळीच्‍या पुढच्‍या दुरुस्‍त, नादुरुस्‍त रिपब्लिकन पक्ष, पँथर, मास मुव्‍हमेंट, ऐक्‍याच्‍या प्रयोगांनंतरचा पुनरुज्‍जीवित रिपब्लिकन पक्ष या सर्व संघटनात्‍मक आकृतिबंधांचे ‘चिरफळ्या’ हे व्‍यवच्‍छेदक लक्षण बनले. बाबासाहेबांची मूळ सर्वसमावेशक संकल्‍पना कधीच हवेत उडून गेली. या सर्व संघटनात्‍मक रुपांचे म्‍होरके हे बौद्धच राहिलेत. सवर्ण सोडाच, भटक्‍या, आदिवासी, अगदी दलितांतल्‍याही इतर जातींचे कोणी नेतृत्‍वात स्‍वीकारले गेले नाही. हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच.
वर उल्‍लेख केलेल्‍या खुल्‍या पत्रात ‘संसदीय लोकशाहीच्‍या यशस्‍वीतेसाठी आवश्‍यक गोष्‍टी’ सांगताना 7 वी गोष्‍ट नोंदवली आहे- विवेकी लोकमत. या मुद्द्याच्‍या विवेचनात बाबासाहेब म्‍हणतात,
‘अन्‍याय कोणावरही होत असो, अन्‍याय दिसला रे दिसला की, जागृत होऊन उठणारी शक्‍ती म्‍हणजे समष्‍टीची सद्सद्विवेक बुद्धी। सार्वजनिक विवेक बुद्धी याचा अर्थच असा की, जिच्‍या प्रादुर्भावामुळे समाजातील प्रत्‍येक माणूस, मग तो अन्‍यायाचा बळी असो अथवा नसो, अन्‍यायाच्‍या परिमार्जनार्थ पीडितांना साथ द्यायला उभा राहतो।’

हे लिहून आज अर्धे शतक लोटले आहे. लोकशाही ब-यापैकी स्थिरावली आहे. तिच्‍या कौतुकाच्‍या खाती अनेक गोष्‍टी जमा आहेत. तथापि, सामाजिक अत्‍याचाराबाबत, हत्‍याकांडावेळी संवेदना व्‍यक्‍त करताना निखळ, निरपेक्ष असतेच असे नाही. अत्‍याचारितांची जात, धर्म कळला की, एक अदृश्‍य पट्टा आपल्‍या संवेदनांच्‍या प्रकटीकरणाभोवती आवळला जातो. कळत किंवा नकळत. त्‍या समाजघटकांच्‍या उद्रेकांबद्दल, आंदोलनांबद्दल तर हे विशेषच होते. शिवसेनेची किंवा मनसेची तोडफोड आणि मुस्लिम किंवा आंबेडकरी समुदायाची तोडफोड यांत सर्वसामान्‍य सवर्ण माणूस एकच प्रतिक्रिया देत नाही. शिवसेनेची-मनसेची ‘तोडफोड’ ही गैर गोष्‍ट आहे, हे तो बोलतो. पण मुस्लिम आणि दलित यांच्‍या उद्रेकांविषयी तो आणखी पुढे बोलतो....‘ही जात किंवा हा धर्म असाच’. याचा अर्थ, व्‍यवहारात हा प्रत्‍येक सवर्ण दलितांच्‍या किंवा मुस्लिमांच्‍या विरोधातच उभा राहील किंवा त्‍यांना माणूस म्‍हणून मदत करणार नाही, असे नाही. त्‍याच्‍या मनावरील विकृत संस्‍कारांची जळमटे त्‍याच्‍या नकळतही अनेकदा बोलत असतात. पण ही जळमटेच अत्‍याचारितांच्‍या भोवती संरक्षणाचा कोट उभा राहण्‍यास अडथळा ठरतातही जळमटे झटकून बाबासाहेबांना अभिप्रेत ‘सार्वज‍निक विवेक’ जागृत करण्‍याचे, त्‍यायोगे लोकशाही पूर्णतः यशस्‍वी करण्‍याचे प्रयास होताना ठळकपणे दिसत नाही. म्‍हणजे तशी चळवळ दिसत नाही. जे शल्‍य मला डाचते आहे, अस्‍वस्‍थ करते आहे ते हे.
मनोहर कदमना जन्‍मठेपेची शिक्षा झाली आणि दोन विभागांतून दोन प्रतिक्रिया व्‍यक्‍त झाल्‍या. दलित विभागातून आनंद प्रकट करुन प्रतिक्रिया आली- ‘जातियवादी नराधमाला अखेर शिक्षा झाली’. सवर्णांतून औपचारिक प्रतिक्रिया सावधपणे, पण खाजगीत ‘कदम हा व्‍यवस्‍थेचा बळी, किंवा बळीचा बकरा झाला’ असे बोलले जाऊ लागले. ‘बळीचा बकरा’ म्‍हणणा-यांमध्‍ये या खटल्‍याचे तपशील, त्‍या घटनेची तीव्रता माहीत नसलेले-विसरलेलेही अनेक जण होते. जे दलितांच्‍या अजिबात विरोधात नाहीत किंबहुना बाजूचेही आहेत.
या दोन्‍ही प्रतिक्रियांचा मला त्रास झाला. जबाबदार व वस्‍तुनिष्‍ठ प्रतिक्रिया का असू नयेत ? ...हा तसा भाबडा प्रश्‍न आहे, हे मला कळते. पण अशा प्रतिक्रियांचा दिवस लवकर यावा, ही माझी मनोमन इच्‍छा (श्रद्धा म्‍हणा हवे तर) आहे.
भाजप-सेनेच्‍या सरकारचा वरदहस्‍त, मनोहर कदम यांचे मराठा असणे या बाबी त्‍यांना दलितांच्‍या विषयी आकस असेल, असे गृहीत धरायला पूरक आहेत. पण हे मनाचा फोटो काढण्‍यासारखे झाले. प्रत्‍यक्षात मनोहर कदम यांच्‍या मनात असे काहीही नसणे, केवळ एका प्रक्षुब्‍ध जमावाला रोखताना घेतलेला चुकीचा निर्णय असेही असू शकेल. या गोळीबारानंतर कदमांना जे दोन्‍ही सरकारांनी संरक्षण दिले, त्‍याबद्दल मात्र त्‍यांचे ‘मराठा’ असणे उपयुक्‍त ठरले, असे म्‍हणण्‍यास पुष्‍कळ आधार आहे.
टँकर जाळायला जमाव येत होता, म्‍हणून गोळीबार करावा लागला, ही कथा न्‍यायालयाने खोटी ठरवली. आधी अश्रुधूर, मेगॅफोनवरुन आवाहन आणि मग गोळीबार, तोही कमरेच्‍या खाली यांपैकी काहीही न करता कदमांनी सैरावैरा गोळीबार करण्‍याचा आदेश दिला. अशारीतीने कायद्याच्‍या रक्षणकर्त्‍यानेच कायदा हातात घेतल्‍याने ही जन्‍मठेपेची सजा सुनावली गेल्‍याचे न्‍यायालयाने म्‍हटले आहे. हा निकाल देणारे न्‍यायाधीश कुलकर्णी हे ब्राम्‍हण व मदतकारक ठरलेली साक्ष देणारे मोरे हे मराठा पोलीस अधिकारी होते.
आंबेडकरी समुदायात पुन्‍हा चीड निर्माण व्‍हावी, अशा घटना पुढे घडू लागल्‍या. पोलीस महासंचालक श्री. विर्क, दंगलींना अटकाव करण्‍यासाठी मोहल्‍ला कमिट्यांचा भिवंडीत यशस्‍वी प्रयोग करणारे ज्‍येष्‍ठ पोलीस अधिकारी श्री. खोपडे यांसारख्‍या काही अधिका-यांनी मनोहर कदम हे ‘व्‍यवस्‍थेचे बळी’ आहेत, असे जाहीरपणे म्‍हटले. असे समजू की त्‍यांना तत्‍कालीन काही आतल्‍या गोष्‍टी माहीत असतील. त्‍यांच्‍या दृष्‍टीने कदम हे निरपराध असतील. पण कायदेशीर प्रक्रियेत ते त्‍यांना सहाय्य करु शकले असते. जाहीरपणे अशी प्रतिक्रिया देण्‍यातून (तेही सरकारचे अधिकारी म्‍हणून घटक असताना) आंबेडकरी समुदायाच्‍या जखमेवर मीठ चोळल्‍यासारखेच झाले. हे मुद्दाम की अभावितपणे ? ...पुन्‍हा तोच मनाचा फोटो !
मनोहर कदमांना वरच्‍या न्‍यायालयाने-उच्‍च न्‍यायालयाने जामीन दिला. एवढेच नाही, तर त्‍यांनी न मागताही त्‍यांची शिक्षा तहकूब करायचा आदेश दिला. ‘केवळ स्‍वरक्षणाचा अधिकारच नव्‍हे, तर राज्‍य राखीव पोलीस दलाच्‍या कायद्यातील कलम 11 प्रमाणे ज्‍यावेळी जीविताला धोका असेल किंवा सरकारी अथवा खाजगी मालमत्‍तेचे नुकसान होण्‍याचा संभव असेल, अशावेळी पोलीस बळाचा वापर करु शकतात, जरी त्‍यामुळे काही मृत्‍यू होण्‍याची शक्‍यता असली तरी.’....असेही उच्‍च न्‍यायालयाने जामीन देताना नोंदवले आहे. कदमांच्‍या वकिलांनी निदर्शनास आणून दिलेल्‍या आणखी काही कलमांचा आधार कबूल करुन कदमांना उच्‍च न्‍यायालयात आपली बाजू लढविण्‍याला मजबूत पाया आहे, असेही उच्‍च न्‍यायालयाने म्‍हटले आहे.
...मनोहर कदमांच्‍या ‘जन्‍मठेपेचे’ पुढे काय होणार, हे आता अनिश्चित झाले आहे, हे निश्चित. मात्र याचे खरे-खोटे राजकारण करणे हे पुढेही चालू राहणार.
या सगळ्यात एक मुद्दा अजिबात ऐरणीवर येत नाही. ज्‍यामुळे लोक प्रक्षोभित होऊन रस्‍त्‍यावर उतरले ती घटना विस्‍मरणात गेली आहे. बाबासाहेबांच्‍या पुतळ्याला चपलांचा हार घालून विटंबना करणारा कोण होता, हा प्रश्‍न आज अनुत्‍तरीतच आहे. विटंबना करणारा न सापडल्‍याने पोलिसांनी ती केस फाईल केली आहे. समाजात तेढ निर्माण व्‍हावी म्‍हणून जाणीवपूर्वक अशा घटना घडवणारे नेहमीप्रमाणे इथेही नामानिराळे राहण्‍यात यशस्‍वी ठरले. ‘ती कीड नष्‍ट करण्‍याचे प्रयत्‍न’ हे चळवळीचे मुख्‍य ध्‍येय या गदारोळात कुठच्‍या कुठे उडून गेले आहे. ही बाब मला अस्‍वस्‍थ करते आहे.
आंबेडकरी चळवळ कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्‍या भू‍मिहीनांच्‍या आंदोलनाचा व दलित पँथरच्‍या जाहीरनाम्‍याचा अपवाद वगळता कायम प्रतिक्रियात्‍मक आंदोलन करत राहिली. उसंत घेऊन लांब पल्‍ल्‍याची विचारपूर्वक बांधणी व कार्यक्रम तिला अंगिकारताच आला नाही. बाबासाहेबांच्‍या विचार व प्रतिमेचा तेजस्‍वी दीपस्‍तंभ समोर असतानाही हे झाले नाही. आंबेडकरी नेत्‍यांचा व्‍यक्तिवादी व्‍यवहार, अहंता, द्रष्‍टेपणाचा अभाव, संकुचित सत्‍ताकांक्षा यांच्‍या वावटळीत हा दीपस्‍तंभच झाकोळून गेला आहे. आंबेडकरी नेत्‍यांची ही सर्व वैशिष्‍ट्ये त्‍यांच्‍या अनुयायांतच नव्‍हे, तर त्‍यांच्‍या वरील लक्षणांच्‍या विरोधात बंड करणा-यांच्‍यातही नंतर आपोआप येतात. आपला समाज सत्‍ताधारी करायचा तर केवळ 7 टक्‍के बौद्ध समाज किंवा 13 टक्‍के दलित समाज आधाराला असून पुरेसा नाही, हे या सर्वांना पूर्णपणे कळते. बाबासाहेबांच्‍या संकल्‍पनेतील रिपब्लिकन पक्ष केला तरच हे शक्‍य आहे, हे त्‍यांना ठाऊक आहे. ‘खुले पत्र’ त्‍यांना पाठ आहे. पण लांब पल्‍ल्‍याच्‍या व्‍यापक लोकशाही प्रस्‍थापनेच्‍या सर्वसमावेशक लढ्यात ‘आपले’ काय होईल, कधी होईल, हा त्‍यांना सतावणारा खरा प्रश्‍न आहे. तेवढी सबुरी धरली तर आपले आयुष्‍यच संपून जाईल. त्‍यापेक्षा व्‍यापकतेची झूल पांघरुन जातींच्‍या बेरजा करण्‍याचे ‘स्‍वाभिमानी’ (चलाख) राजकारण हा काहींना शॉर्टकर्ट वाटतो, तर काहींना जातीयवादी शक्‍तींचा निःपात करण्‍यासाठी सत्‍ताधा-यांशी सहकार्य (म्‍हणजे स्‍वतःला आमदार, खासदार किंवा मंत्रिपद मिळवणे) ही ‘ता‍त्विकता’ सोयीची वाटते.
या व्‍यवहारात कष्‍टक-यांच्‍या लढ्यात आघाडीवर राहू शकणारी आंबेडकरी तुकडी गारद होत आहे. हे केवळ आंबेडकरी नाही तर एकूण प्रगतीशील चळवळीचे प्रचंड नुकसान आहे. तथापि, प्रगतीशील चळवळीतील सवर्ण कार्यकर्त्‍यांकडून ही बाब दुरुस्‍त करण्‍याचे प्रयत्‍न त्‍या अगत्‍याने होताना दिसत नाहीत. महाराष्‍ट्रात जिथे दलितांवरच्‍या अत्‍याचाराचे प्रसंग घडतात, तिथे त्‍याच्‍या आसपासच्‍या शहरातील शिक्षित आंबेडकरी कार्यकर्ताच आवाज उठवताना दिसतो. या आंदोलनांना काही ठिकाणी सवर्ण कार्यकर्त्‍यांचा पाठिंबाही असतो. पण सवर्ण कार्यकर्त्‍यांनी किंवा त्‍यांचा सहभाग असलेल्‍या संघटनांनी या अत्‍याचाराच्‍या विरोधात पुढकाराने आवाज उठवला आहे, तो प्रश्‍न लावून धरला आहे, ज्‍या सवर्णांनी हा अत्‍याचार केला आहे, त्‍यांच्‍या विरोधात ‘पापक्षालनासाठी उपोषण’ सवर्ण कार्यकर्ते धरत आहेत, समता यात्रा काढत आहेत, असे चित्र प्रसारमाध्‍यमांतून पुढे येते आहे, असे होत नाही. असे झाले तर दलित समाज ही आमचीच मालमत्‍ता असे समजणा-या दलित नेत्‍यांना चाप लागेल तसेच व्‍यापक एकजुटीची मनापासून इच्‍छा असलेल्‍या परंतु अल्‍पसंख्‍य असलेल्‍या दलित कार्यकर्त्‍यांना ताकद मिळेल.
कष्‍टक-यांच्‍या व्‍यापक आर्थिक लढ्यातून आपोआप सांस्‍कृतिक प्रश्‍न सुटणार नाहीत. ते आनुषंगिकपणेही घेऊन चालणार नाही. ते स्‍वतंत्रपणे लढावे लागतील. आणि ते लढतो आहोत, हे दिसावेही लागेल. हे अवधान, अगत्‍य कष्‍टक-यांच्‍या लढ्यातील सवर्ण नेतृत्‍वाने दाखवणे हा संपूर्ण उपाय नसला, तरी योग्‍य दिशेने पुढे सरकण्‍याचे एक अत्‍यंत महत्‍वाचे पाऊल जरुर आहे.
ते पडले की माझ्या अस्‍वस्‍थतेलाही बहुधा उतार पडू लागेल।

- सुरेश सावंत

Saturday, April 25, 2009

POLITICAL PARTIES AND THE RIGHT TO FOOD

Loksabha Election 2009



POLITICAL PARTIES AND THE RIGHT TO FOOD




CONGRESS' VIEWS:





NREGA:



There are plans to provide 100 days of work at a real wage of Rs 100 a day for everyone as an entitlement under the NREGA.




NATIONAL FOOD SECURITY ACT:



The Indian National Congress pledges to enact a Right to Food law that guarantees access to sufficient food for all people, particularly the most vulnerable sections of society. The Indian National Congress pledges that every family living below the poverty line either in rural or urban areas will be entitled, by law, to 25 kgs of rice or wheat per month at Rs 3 per kg. Subsidised community kitchens will be set up in all cities for homeless people and migrants with the support of the Central government.




HEALTH SECURITY:



The Indian National Congress pledges that every family living below the poverty line will be covered by the RSBY(A scheme which provides health insurance for poor fmilies) over the next three years. Every district headquarters hospital will be upgraded to provide quality heath facilities to all.




SOCIAL SECURITY:



The Indian National Congress will ensure a comprehensive cover of social security to all persons who are at special risk including (i) single-woman headed households; (ii) disabled and the elderly; (iii) urban homeless; (iv) released bonded workers; (v) members of primitive tribal groups; and (vi) members of designated "most backward" dalit communities.




BHARTIYA JANATA PARTY:




FOOD SECURITY:



The BJP promises to take the following measures:



1. Provide 35 kg of rice or wheat every month to BPL families at Rs 2 per kg under an


improved and expanded Antyodaya Anna Yojana. This will be available against 'Food


Coupons' redeemable at both PDS and private outlets.



2. Allocate more funds for expanding, universalising and improving the functioning of the Public Distribution System.



3. Preventing families from slipping below the poverty line.



4. Setting up community kitchens in extremely impoverished areas with the help of NGOs through shared funding.



5. Aggressively addressing the problem of widespread malnutrition, especially by expanding the scope of the existing mid-day meal scheme.



6. Encouraging the production of cereals and discouraging the conversion of fertile farm


land for dubious industrial projects.



7. Ensuring a sufficient level of food stocks are maintained to meet any exigencies due to


possible global food crisis which could be severely debilitating and make imports prohibitively expensive, if not impossible.



HEALTH:



1. Primary Health Centres to be linked to the National Telemedicine Service Network.



2. The current extremely low salaries of Anganwadi workers and helpers, who are the


backbone of the Integrated Child Development Scheme, will be doubled.



3. 'A Health For ALL' scheme will be launched based on a innovative insurance policy the premium of BPL families will be paid by Government. Beneficiaries will have access to Government and private hospitals for cashless treatment.



4. '108' telephone service - for medical emergencies - universally accessible throughout India in 12 months.



5. Set up a National Regulatory Authority for private hospitals, nursing homes and special care facilities to ensure quality services, affordable fees and prevent/punish malpractice. While private sector participation in health care is welcome, it cannot become a source of unrestricted and unrestrained profit-making at the expense of the people.



6. Incentives and disincentives will be introduced for State Governments to improve the quality of primary health care, maternal health care, and child health care.



7. Targets will be set for achieving significant reduction in maternal and infant mortality by improving the Janani Suraksha Yojana. The successful initiative of the BJP Government in Gujarat in this regard will be used as a model.



8.Preventive health care by way of inoculation against diseases and dissemination of information will receive focussed attention.



9.0 A national programme will be launched to vaccinate adults and children against all forms of hepatitis.



10.Substantial investment will be made in promoting Ayurved as an alternative therapy.Full support will be extended to the promotion of Unani system of medicine and homoeopathy. The promotion of Yoga will receive all Government assistance.



11. Clean drinking water is one of the best barriers against common but often fatal diseases. The BJP proposes to make access to clean drinking water a fundamental right for all citizens.



12. Implementation of of the mid day meal scheme shall be revitalised on modern management lines. Akshaya Patra Scheme will serve as the model for the purpose.



National Identity Cards for All



The BJP will launch an innovative programme to establish a countrywide system of multipurpose national identity cards so as to ensure national security, correct welfare delivery, accurate tax collection, financial inclusion and voter registration. Voter identity cards, PAN cards, passports, ration cards and BPL cards are already in use though not


all with photo identity. The NDA proposes to make it incumbent for every Indian to have a National Identity Card. The programme will be completed in three years. The National Identity Card will contain enough memory and processing capabilities to run multiple applications. Through it the NDA will ensure efficient welfare delivery and tax collection. The card will also be linked to a bank account. All welfare payments, including widow and old age pensions, through the wide range of


schemes such as Mother and Child support/ Kisan Credit, Students Assistance and Micro-Credit will be channelised through the National Identity Card. The card will make it possible for individuals to save and borrow money; for farmers to get bank credit, also establish accurate land titles data. The National Identity Card will also strengthen national security by ensuring accurate citizen identity, thus tracking illegal immigration. All financial transactions, purchase of property and access to public services will be possible only on the basis of the National Identity Card which will be made forgery and hacking resistant





NATIONALIST CONGRESS PARTY:




NREGA:



They insist on increasing the scope of NREGS. More work should be guaranteedand all the people prepared to work should be covered by the scheme and the wages paid to them should be reasonable increased.




SOCIAL SECURITY:




1. Time bound schemes for making drinking water, electricity should be made available to all the villages.



2. Public distribution system should be strengthened .



3. Minimum requirement of food supply should be assured through PDS outlets to all the needy irrespective of poverty line.



4. Comprehensive housing scheme for rehabilitation of all dwellers of slums, bastis and tribal colonies provided with drinking water, electricity, healthcare and education institutions should be implemented.




HEALTH:



1. A new public health policy recognizing the health rights of the people in general and the marginalized sections in particular would be introduced.



2. Primary health centres would be provided with necessary doctors, staff, medical equipments and regular medical supply.



3. Life saving medicines would be made available at affordable rates.



4. Mid day meals programme for school going children would be strengthened.



5. Comprehensive schemes to combat malnutrition among the children.



6. Food security for those belonging to the weaker sections of the society.



7. Specialty hospitals would be started in different parts of the country where medical treatment would be available at reasonable rates.





JANATA DAL(S)



HEALTH:



They plan to introduce a Comprehensive Health Card for the BPL families who will be made entitled to receive treatment including investigation, hospitalization and medicines for all diseases and in all appropriate hospitals in the country. The expenditure on such treatments will be reimbursed to the concerned hospitals by the government.




FOOD SECURITY:



Janatha Dal (Secular) party will introduce conditional direct cash income transfer scheme to the rural landless and urban BPL families on the lines of Brazil, Mexico and Chile. Specified amount of monthly income will be transferred to the women members of the BPL families with the condition that they should get their children immunised and send them to school. This new scheme will enable them to purchase whatever food articles they want. This will also prevent leakages in the distribution of food grains at subsidized price to the BPL families. It will also cover their children under universal immunization programme and will ensure school attendance instead of encouraging child labour.


A nation wide pension scheme will be launched to provide Rs 500 monthly pension to all marginal and small farmers and agricultural labourers above the age of 60 years. This will prevent hunger deaths in remote rural areas.




COMMUNIST PARTY OF INDIA (MARXIST)




FOOD SECURITY:



To ensure food security the CPI (M) advocates:



• Reintroduction of the universal PDS and abandoning the targeted PDS based on flawed poverty estimates; Provision of foodgrains at subsidized rates in the PDS



• Expansion of the Antodaya scheme to cover wider sections of the rural and urban poor; Special measures to include tribal communities in Antodaya coverage.



• Supplying 14 essential commodities including sugar, pulses and edible oils under the PDS.



• Reversing the cut in food grain allocations to the States under the PDS and giving States their full quota of grain



• Strengthening the FCI and expanding of FCI godowns, particularly in the Eastern and North Eastern regions; Curbing procurement of foodgrains by private corporates and MNCs.



•Universalizing the ICDS to cover all children in the 0 to 6 years age group; stopping privatization of the ICDS



• Providing nutritious meals to children in the anganwadis; Ensuring universal immunization.




EMPLOYMENT:



• The employment guarantee to be extended to cover all adults and for as many days as demanded; Employment guarantee to be extended tothe urban areas through the enactment of legislation



• The list of permissible works under the NREGA to be expanded to include all activities that improve the quality of life in rural areas



• Minimum wages should be ensured through fair and objective Schedule of Rates; Part of wages to be paid in subsidised foodgrains





COMMUNIST PARTY OF INDIA



Party will demand universal Public Distribution System (PDS) to ensure food security















Saturday, February 21, 2009

आपल्‍या धडावर आपलेच डोके हवे या डोक्‍यात मानव्‍याच्‍या सुंदरतेचे स्‍वप्‍न हवे

हा लेख निवडक कार्यकर्त्‍यांच्‍या अंतर्गत चर्चेसाठी आहे, प्रसिद्धीसाठी नाही.


आपल्‍या धडावर आपलेच डोके हवे


या डोक्‍यात मानव्‍याच्‍या सुंदरतेचे स्‍वप्‍न हवे


'सम्राट'मध्‍ये कार्तिकी गायकवाडच्‍या विजयाची बातमी अजून कशी नाही आली ?'


'ती 'आपल्‍यातली' नाही म्‍हणून!'


'कशावरुन?'


'तिचे वडिल भजने म्‍हणतात.'


('सम्राट' हे बौद्धांमध्‍ये वाचले जाणारे एक प्रमुख वृत्‍तपत्र. 'आपल्‍यातली' याचा अर्थ बौद्ध. कारण प्रश्‍न विचारणारा मी आणि ज्‍याने उत्‍तर दिले तो असे आम्‍ही दोघेही 'बौद्ध'. बौद्ध झाल्‍यावर हिंदू धर्मातल्‍या देवादिकांची पूजा करणे अधिकृतपणे नाकारले गेल्‍याने ज्‍याअर्थी कार्तिकीचे वडिल हिंदू देवांची भजने म्‍हणतात, त्‍याअर्थी ते बौद्ध नसणार, असा माझ्या मित्राचा तर्क. प्रत्‍यक्षात असंख्‍य बौद्ध मंडळी आजही हिंदू देवतांची पूजा, नवससायास करताना सर्रास दिसतात.)


माझ्या प्रश्‍नाला दै. सम्राटचा वाचक असलेल्‍या माझ्या मित्राने दिलेले हे उत्‍तर बरोबर असेलच असे नाही. अनेक बातम्‍या द्यायच्‍या राहून जातात, तसेच ही बातमी राहूनही गेली असेल.


पण हेही खरे की, अभिजित सावंत, अभिजित कोसंबी आणि वैशाली माडेच्‍या वेळी फक्‍त बातम्‍याच नव्‍हे, तर एसएमएस करण्‍याचे आवाहन करणारी मोहीमच 'सम्राट'ने चालवली होती. या तिघांपैकी पहिले दोघे हे 'बौद्ध' होते, तर वैशाली बौद्ध असल्‍याचा एक लेखच सम्राटमध्‍ये आला होता. परंतु काहींचे म्‍हणणे ती बौद्ध नव्‍हती, ओबीसींपैकी कोणीतरी होती.


मग कार्तिकी गायकवाड कोण?


ती बौद्ध नसेलही, माळी, साळी, तेली..अशी ओबीसी असेल किंवा मराठाही असू शकेल. पण 'गायकवाड' आडनाव, तिचे, तिच्‍या वडिलांचे दिसणे, उच्‍चार पाहता ती 'ब्राम्‍हण' किंवा तत्‍सम उच्‍च जातींपैकी नक्‍कीच नसावी. म्‍हणजेच खात्रीने 'बहुजन' असावी.


इथवरची चर्चा वाचताना तुमच्‍यापैकी काहींना रागही आला असेल. तुम्‍ही मनात म्‍हणत असाल, कार्तिकी किंवा वैशाली किंवा दोन्‍ही अभिजित इतके उत्‍कृष्‍ट गायले, की त्‍यामुळे ते 'सा रे ग म प (हिंदी किंवा मराठी)' चे महाविजेते ठरले. त्‍यांची 'गुणवत्‍ता-मेरिटच' तसे होते! त्‍यांच्‍या जातींचा काय संबंध? अशी जातींची चर्चा करणे म्‍हणजे निव्‍वळ मागासपणा (एकप्रकारचा 'जातिवाद'च) नाही का?


असा राग येणा-या मोकळ्या, निरागस मनाचा, वृत्‍तीचा मला जरुर आदर आहे. सगळा समाज तसाच व्‍हावा, अशी माझी मनोमन इच्‍छा आहे. तथापि, ही निरागसता अजून बहुसंख्‍यांची झालेली नाही. त्‍यांच्‍या वागण्‍या-बोलण्‍यात, लग्‍ना‍सारख्‍या बाबींमध्‍ये, मतदानांमध्‍ये, आरक्षणाबाबत चर्चा करताना 'जात' हा घटक अपरिहार्य असतो. म्‍हणूनच कोणत्‍याही सामाजिक घटनेचे मापन करताना इतर अनेक घटकांबरोबर 'जात' हा घटक लक्षात घ्‍यावाच लागतो.


आता, इथेच पहा ना, याआधी गरीब-कष्‍टकरी, मागास समाजातून अभिजित सावंत, अभिजित कोसंबी किंवा वैशाली-कार्तिकी अशा पुढे आलेल्‍यांचे प्रमाण काय होते? कोणी म्‍हणेल, अशी टीव्‍ही चॅनेल्‍स आणि असे कार्यक्रम पूर्वी कोठे होते? बरोबर. पण संगीताचे, गायकीचे क्षेत्र यापूर्वी होतेच ना? त्‍यातील प्रस्‍थापित मंडळींची नावे तपासून पहा. त्‍यात ब्राम्‍हण समकक्ष जातींची नावे किती आणि बहुजनांतील नावे किती, ते आठवून पहा. साडेतीन-चार टक्‍क्‍यांच्‍या आसपास असलेल्‍या महाराष्‍ट्रातील ब्राम्‍हणांनी जवळपास शहाण्‍णव टक्‍के जागा व्‍यापलेल्‍या दिसतील. आजही हे प्रमाण खूप घसरलेले नाही. त्‍याला धक्‍के बसू लागले आहेत, हे मात्र खरे. ते जेव्‍हा, कोणत्‍याही आरक्षणाविना जातींच्‍या टक्‍केवारीइतकेच प्रत्‍येक क्षेत्रात दिसू लागेल, तेव्‍हाच, आपल्‍याला 'निरागस' राहणे परवडू शकेल. तोवर 'जातिग्रस्‍त' समाजातील 'जातवास्‍तवाचा' विचार अ‍ावश्‍यक असतो. जातिव्‍यवस्‍था नष्‍ट करु पाहणा-यांना तर हा विचार अपरिहार्यच आहे.


जातींना व्‍यवसाय होते, तोवर जाती टीचभर हलणेही शक्‍य नव्‍हते. जोवर चांभार चपलाच करणार, महार येसकरीच करणार, तेली तेलच काढणार, तोवर त्‍यांची ओळख त्‍यांच्‍या जातीनेच होत होती. (म्‍हणजे तो गणूतेल्‍याचा पोरगा, सोन्‍याकुंभाराचा गंग्‍या इ.) किंवा गावात आळ्यांप्रमाणे किंवा वाड्यांप्रमाणे वस्ती असेल तोवरही हे संबोधन राहणार. (उदा. मांगवाड्यातला चंदर). पुढे भांडवलशाहीने कारखाने-उद्योगांना जन्‍म दिला. त्‍यात काम करण्‍यासाठी गावातून माणसे शहरांत आली. काही कामे त्‍यांच्‍या परंपरागत व्‍यवसायांशी सबंधित राहिली (उदा. सफाई), तरी बहुसंख्‍य कामे ही जातिनिहाय व्‍यवसायांच्‍या बाहेरची होती. अनेक अस्‍पृश्‍य समाजातले लोक गिरणीत कामाला लागले. काही खाती त्‍यांना प्रारंभी वर्ज्‍य होती, तरी इतर अनेक खात्‍यांत स्‍पृश्‍य कामगारांबरोबर त्‍यांना एकत्र काम करावे लागे. त्‍या सगळ्यांची ओळख 'गिरणी कामगार' अशीच होती. ट्रामचे, रेल्‍वेचे डबे सगळ्यांना एकच होते. एका डब्‍यातले 'प्रवासी' जातीने वेगवेगळे असले तरी त्‍यांना परस्‍परांचा स्‍पर्श, सावली चाले. त्‍याला इलाजही नव्‍हता. शहरात जाती ब-याचशा निराकार दिसत, मात्र गावी गेल्‍यावर या जाती ठसठशीत होत. कारण प्रत्‍येकाच्‍या वाड्या वेगळ्या. आमच्‍या गावातला भिकू सुतार आणि माझे वडिल एकाच गिरणीत. मुंबईच्‍या आमच्‍या झोपडीत भिकू सुतार सहज चहा पीत असे. पण गावी गेल्‍यावर तो आमच्‍या घरी पाणी पीत नसेच, शिवाय त्‍याच्‍या घरी गेल्‍यावर माझ्या घरच्‍यांना वरुन पाणी देत असे.


आता पुढच्‍या पिढीत लक्षणीय बदल झाला आहे. आधीची पिढी दोन्‍हीकडे निरक्षरच होती, आताची पिढी शिक्षित आहे. कोकणातील काही गावांत तर ब्राम्‍हणांनंतर शिकलेल्‍यांचे प्रमाण हे बौद्धांमध्‍येच (म्‍हणजे पूर्वाश्रमीची महार ही अस्‍पृश्‍य जात) जास्‍त आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या 'शिका, संघटित व्‍हा, संघर्ष करा' या मंत्राचा तसेच 'खेडी सोडून शहरांकडे चला' या आदेशाचा, जुना माणुसकीहीन धर्म त्‍यागून नव्‍या, उच्‍च नैतिकता व विज्ञान यांची सांगड असलेल्‍या 'बौद्ध' धर्माच्‍या स्‍वीकाराचा आणि खुद्द बाबासाहेबांच्‍या स्‍वतःच्‍या उच्‍चविद्याविभूषित प्रतिमेचा हा परिणाम आहे. जीवनबदलाची ही जबरदस्‍त प्रेरणा आणि राखीव जागा-सवलतींनी दिलेल्‍या संधी यांच्‍या संयोगाने विद्वत्‍ता, साहित्‍य, शासकीय अधिकार क्षेत्रांत (वकील, डॉक्‍टर, सनदी अधिकारी, प्राध्‍यापक, विचारवंत, लेखक, उच्‍च पोलीस अधिकारी इ.) बौद्ध समाजातील व्‍यक्‍ती लक्षणीयरीत्‍या चमकू लागल्‍या. 


प्रारंभी, बौद्धांची गती अन्‍य पूर्वाश्रमीच्‍या अस्‍पृश्‍य जाती आणि ब-याचशा ओबीसी जाती यांना साधता आली नाही, तरी आता त्‍याही जोरात मुसंडी मारु लागल्‍या आहेत. शेतिव्‍यवस्‍थेचे आणि जातनिहाय व्‍यवसायांचे कोलमडणे, भांडवली व्‍यवस्‍थेने विविधांगी व्‍यवसायांना जन्‍म देणे, शिक्षणाचा विस्‍तार होणे इ. कारणे यामागे आहेत. या जातींमध्‍ये अंतर्गत श्रेणी आजही आहेत. तथापि, प्रस्‍थापित सांस्‍कृतिक मानदंडाप्रमाणे ब्राम्‍हण समकक्ष जातींच्‍या दृष्‍टीने या सर्व जाती 'आनि-पानीवाल्‍या' आहेत. (म्‍हणजे ज्‍यांच्‍यातील बहुसंख्‍यांना पाणी किंवा आणितला 'णी' उच्‍चारता येत नाही, ते त्‍याचा 'नी' असा उच्‍चार करतात किंवा त्‍यांच्‍यातील मुली 'आले-गेले' ऐवजी 'आली-गेली' असे म्‍हणतात.) या सर्वांची ओळख सर्वसाधारणपणे 'बहुजन' अशी केली जाते.


अशा या 'बहुजनां' तल्‍या मुला-मुलींनी दूरदर्शनच्‍या वाहिन्‍यांनी संधी देताच तिकडे धाव घेतली. कोणत्‍याही कलेला, प्रतिभेला जातींचे रिंगण असतच नाही. तथापि, गाणी, नृत्‍य, वादन ही बहुजन वर्गाची जुनी परंपरा. मात्र त्‍यांची सांस्‍कृतिकदृष्‍ट्या वरच्‍या स्‍थानावर असलेल्‍या ब्राम्‍हण वर्गाने शास्‍त्रीय रचना, संहितीकरण केल्‍याने, त्‍यांतले रांगडेपण जाऊन त्‍यांत एक प्रतिष्ठित सफाईदारपणा आला. उच्‍चारांमध्‍ये प्रमाण भाषा आली. गाणी अनेक जण म्‍हणतच होते, आजही म्‍हणतात. परंतु, त्‍यांत कोणतातरी राग असतो, हे अनेकांना ठाऊक असतेच असे नाही. जे ते शिकतात, त्‍यांना ते राग कळतात. त्‍यांच्‍यात एक सफाईही त्‍यामुळे येते. आणि त्‍यामुळे त्‍यांना प्रतिष्‍ठाही मिळते. आजवर या औपचारिक शास्‍त्राचे कर्तेधर्ते मुख्‍यतः ब्राम्‍हण समकक्ष जातींतलेच लोक राहिले. तेच गुरु किंवा मार्गर्शक किंवा मान्‍यता देणारे राहिले. बहुजनांतल्‍या गाणा-यांना नुसते गाऊन चालत नाही, नुसते नाचून चालत नाही. ते गाणे, ते नृत्‍य प्रस्‍थापित निकषांवर उतरले पाहिजे. पूर्वी या निकषांच्‍या पात्रतेला उतरण्‍यासाठी बहुजनांना प्रत्‍यक्ष अथवा अप्रत्‍यक्ष प्रवेशच नाकारला जाई. आता बहुजनवर्गातील काहींचा शिक्षण, राजकीय ताकद यामुळे वरच्‍या थरांतील वावर वाढल्‍याने आणि दूरदर्शन वाहिन्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या गरजेपोटी हा प्रवेश मिळू लागला आहे. त्‍यांतील स्‍पर्धक विजेतेही होऊ लागले आहेत.


वाहिन्‍यांची स्‍वतःची गरज याचा अर्थ, या वाहिन्‍या चालवणा-या भांडवलदारांचा नफा. या नृत्‍य, गाण्‍याच्‍या स्‍पर्धा जाहिरातींबरोबरच एसएमसएसवर आधारित असतात. हे एसएमएस तीन किंवा सहा रुपयांचे असतात. सामान्‍य एसएमएस मोफत किंवा तीस पैसे, पन्‍नास पैसे, एक रुपया असे असतात. हे जास्‍त दराचे जास्‍तीत जास्‍त एसएमएस मिळवणे म्‍हणजे अधिकाधिक नफा मिळवणे हा या वाहिन्‍यांच्‍या मालकांचा उद्देश असतो. प्रत्‍येक प्रेक्षक स्‍पर्धकाची जात बघून एसएमएस करतो असे नाही. तथापि, जातिग्रस्‍त समाजात अनेकांकडून जातही पाहिली जाते. ब्राम्‍हण स्‍पर्धकाला मिळणारे त्‍याच्‍या जातीचे एसएमएस आणि बहुजनांतल्‍या स्‍पर्धकाला मिळणारे एसएमएस यात संख्‍येचा विचार केला, तर बहुजनांतल्‍या स्‍पर्धकाला ते अधिक मिळण्‍याची शक्‍यता असते. ('शक्‍यता असते' असते, असे म्‍हटले आहे. याचा अर्थ, मिळतीलच असे नाही.) आता मोबाईल हे साधन कोणत्‍याही जाती-धर्माच्‍या तसेच गरिबातल्‍या गरीब माणसाला सहज उपलब्‍ध आहे. तंत्रज्ञानाने सामाजिक बदलाला कशी चालना मिळू शकते, त्‍याचे हे एक उदाहरण आहे. ब्राम्‍हणी मनोवृत्‍तीच्‍या कोणाही परीक्षकांना बहुजनांतल्‍या अशा एखाद्या स्‍पर्धकाला जाणूनबुजून वगळणे आता कठीण आहे. असे वगळले गेल्‍याचे बहुजन प्रेक्षकांना कळणे, त्‍या वाहिनीच्‍या प्रतिमेला आणि टीआरपीलाही (पर्यायाने नफ्याला) घातक असते. त्‍या वाहिनीच्‍या चालकांना (जरी ते उच्‍चवर्णीय असले तरी) ते परवडणारे नसल्‍याने ते असा प्रकार न घडण्‍याचीच दक्षता घेणार. मानवी विकासक्रमात सरंजामशाहीच्‍या पुढचा टप्‍पा असलेल्‍या भांडवली अर्थव्‍यवस्‍थेला जातींचे जुने संदर्भ सांभाळणे उपयोगाचे नसते.


वर 'ब्राम्‍हणी वृत्‍तीच्‍या परीक्षकांना' असे म्‍हटले आहे. याचा अर्थ, जे जातीच्‍या आधारावर भेदभाव करतात, असे. ('ब्राम्‍हण्‍य' व 'ब्राम्‍हण' हा फरक खुद्द बाबासाहेबांनीच केला आहे.) ब्राम्‍हण जातीचे सगळे परीक्षक असे वागतात, असे नाही. उलट आज परीक्षकांमध्‍ये ब्राम्‍हण समकक्ष जातींचे लोक अधिक प्रमाणात असतानाही त्‍यातले कित्‍येक जण बहुजनांतल्‍या प्रतिभावान मुलांचे मनापासून कौतुक करताना, त्‍यांना प्रोत्‍साहन देताना दिसतात. ते केवळ तोंडदेखले किंवा एसएमसएसच्‍या, वाहिनीच्‍या मालकांच्‍या दबावापोटी तसे वागतात, असे म्‍हणणे त्‍यांच्‍यावर अन्‍याय करण्‍यासारखे होईल. तसेच वर एके ठिकाणी सगळेच प्रेक्षक जाती बघून एसमएमस करत नाहीत, असेही म्‍हटले आहे. त्‍याचे कारण महाराष्‍ट्राला संतांची तसेच सामाजिक सुधारकांची एक मोठी परंपरा आहे. या परंपरेचे संस्‍कार आणि नवे तंत्रज्ञान व भांडवली व्‍यवस्‍थेचे, जागतिक बदलांचे गतिमान वातावरण यांचा परिणाम परीक्षक व प्रेक्षक दोहोंवरही असतोच. शिवाय काही चांगुलपणावर श्रद्धा असलेली, निरागस मने असतातच.


तथापि, तंत्रज्ञान, भांडवली व्‍यवस्‍था अशा भौतिक-आर्थिक बदलांची गती आणि मने बदलण्‍याची गती सारखी असत नाही. घरी आणलेल्‍या नव्‍या कॉम्‍प्‍युटरला हळद-कुंकू वाहून त्‍याची पूजा करणारे आढळतातच. जुने संस्‍कार हे सूर्य मावळल्‍यासारखे पटकन अदृश्‍य होत नाहीत. संधिप्रकाशासारखे ते आसमंतात बराच काळ रेंगाळत राहतात. सूर्य मावळला असल्‍याने या संध्‍याछाया अखेरीस अंधारात गुडूप होणार हे अटळ असते. मानवी जीवनात हा संधिप्रकाश लुप्‍त होणे हे अटळ असले तरी निसर्गाप्रमाणे त्‍याची वेळ ठरलेली नसते किंवा ते आपसूकही होत नसते. ही वेळ कमी जास्‍त होण्‍यात मानवी प्रयत्‍नांचा मोठा वाटा असतो. म्‍हणूनच तंत्रज्ञान व भांडवली अवस्‍थेने जातिव्‍यवस्‍थेचा आधार काढून घेतला असला तरी समाजप्रबोधन आवश्‍यक ठरते. संतांच्‍या प्रबोधन काळात गावगाडा हलण्‍याची काहीच शक्‍यता नव्‍हती, आता गावगाडा जवळपास कोलमडला आहे. अशावेळी प्रबोधनाचे जाणते, सम्‍यक प्रयत्‍न अथकपणे व्‍हायला हवेत. 


जाणते, सम्‍यक प्रयत्‍न म्‍हणजे काय, हे थोडे समजून घ्‍यायला हवे. इथे, वर एके ठिकाणी कंसात केलेला बाबासाहेबांचा ब्राम्‍हण्‍यासंबंधीचा उल्‍लेख अधिक विस्‍ताराने करतो. चवदार तळ्याच्‍या सत्‍याग्रह प्रसंगी ब्राम्‍हणेतर चळवळीतले नेते ब्राम्‍हणांना या सत्‍याग्रहात सोबत न घेण्‍याच्‍या अटीवर बाबासाहेबांना सहकार्य देण्‍यास तयार होते. बाबासाहेबांनी ही अट अमान्‍य केली. ती अमान्‍य करताना 'मी 'ब्राम्‍हण्‍या'च्‍या विरोधात असून ब्राम्‍हणांच्‍या नाही' असे म्‍हटले होते. पुढे एके ठिकाणी त्‍यांनी असे नमूद केले आहे की, 'मी ब्राम्‍हण्‍यग्रस्त ब्राम्‍हणांच्‍या, ब्राम्‍हण्‍यग्रस्‍त ब्राम्‍हणेतरांच्‍या आणि ब्राम्‍हण्‍यग्रस्‍त बहिष्‍कृतांच्‍या(म्‍हणजे दलितांच्‍या)ही विरोधात आहे.' 'ब्राम्‍हण्‍य' याचा अर्थ भेदभाव, विषमता जोपासणारी वृत्‍ती. ही वृत्‍ती कोणी विशिष्‍ट जातीत जन्‍माला आला आहे, म्‍हणून त्‍याच्‍यात असते आणि कोणी त्‍या जातीत जन्‍माला आला नाही, म्‍हणून त्‍याच्‍यात नसते, असे नाही. वृत्‍तीची जन्‍मजातता बाबासाहेबांनी नाकारली आहे. ब्राम्‍हण जातीत जन्‍माला आलेला तो प्रतिगामी आणि दलितांत जन्‍माला आलेला तो जन्‍मजात पुरोगामी, हे बाबासाहेबांच्‍या विचारसरणीत बसत नाही. (माझी आई मांगाकडे जेवू नको, असे आवर्जून मला बजावायची. आज बौद्ध मातंगांशी सहज सोयरिक करताना दिसत नाहीत. चांभार तर दलितांत स्‍वतःला उच्‍च समजतात. ब्राम्‍हण-बौद्ध लग्‍न त्‍या मानाने सहज होईल. पण चांभार-बौद्ध लग्‍न बरीच कठीण गोष्‍ट असते.) एकदा जात जन्‍माने येते, म्‍हणून वृत्‍तीही जन्‍मजात मानली की जाती नष्‍ट होण्‍याची शक्‍यताच संपुष्‍टात येते. मग जातिनिर्मूलनाच्‍या किंवा समतेच्‍या आंदोलनाला काही अर्थच उरत नाही.


संस्‍कार संधिप्रकाशासारखे रेंगाळत राहतात, ते सामान्‍यांच्‍या मनात. पण काहीजण त्‍यांचा आपल्‍या संकुचित स्‍वार्थासाठी वापर करतात. एकदा गवळी वाडीत वरुन पाणी देण्‍यावरुन आम्‍ही बौद्धवाडीतल्‍या तरुणांनी मुद्दाम पाणी मागून झगडा केला. पोलिसांत गेलो, वगैरे. त्‍यावेळी आमच्‍या वाडीतल्‍या एका म्‍हाता-याचे आणि गवळी वाडीतल्‍या एका म्‍हाता-याचे उद्गार मला अजून आठवतात. आमच्‍या बौद्धवाडीतल्‍या अनेक म्‍हाता-यांना आमचे हे झगडा करणे मंजूर नव्‍हते. गावातली शांतता आम्‍ही बिघडवतो, असे त्‍यांना वाटे. 'आपण आता बौद्ध झालो आहोत. पण तुम्‍हाला स्‍वाभिमान नाही. तुम्‍ही वरुन पाणी पिता म्‍हणून हे सवर्ण सोकावलेत' असे आम्‍ही त्‍यांना ऐकवत असू. त्‍यावर एक म्‍हातारा म्‍हणाला, 'अरे आपण आता बौद्ध आहोत. पण पूर्वीचे महारच ना! वरुन पाणी प्‍यायची रीतच आहे. ती लगेच कशी जाईल?' तर जिथे आम्‍ही झगडा केला, त्‍या गवळी वाडीतला एक म्‍हातारा म्‍हणाला, 'पोरांनो, आमच्‍याने हे वरुन पाणी देणे बंद होणार नाही. आम्‍ही त्‍याच रीतीत वाढलो. पण आमची पोरे बदलतील.'


तेव्‍हा आम्‍ही सगळे 'अँग्री यंग मॅन' होतो. कोकणात सवर्ण-दलित भेद असला तरी उर्वरित महाराष्‍ट्रासारखी येथील सवर्णांच्‍यात मुजोरी नाही. दलित वस्‍तीवर हल्‍ला, अत्‍याचार वगैरे प्रकार नाहीत. आमच्‍या गावात तर शिक्षण, नोकरी यात सवर्णांपेक्षा आम्‍ही बौद्धच पुढारलेले. मागासवर्गीय म्‍हणून वीज आणि रस्‍ता या सुविधा इतर अनेक वाड्या आमच्‍यापेक्षा मागास असतानाही नियमाप्रमाणे आमच्‍या वाडीत आधी आल्‍या. सामंजस्‍याने गावविकासाच्‍या व्‍यापक आंदोलनातूनच इथला समतेचा लढा पुढे जाऊ शकतो, हे आम्‍हाला तेव्‍हा कळत नव्‍हते.


उदाहरण जरा लांबले. तेव्‍हा मुद्दा हा की, वरील दोन्‍ही म्‍हाता-यांच्‍या मनात संस्‍कारांचा संधिप्रकाश रेंगाळत होता. त्‍यांच्‍या पुढची पिढी बदलणार होती. ती बदलते आहे. हे सगळे सामान्‍य लोक. त्‍यांच्‍याशी व्‍यवहार सरळ आहे. पण जे आपल्‍या स्‍वार्थासाठी जाणीवपूर्वक सामान्‍यांच्‍या मनातील या भावनेचा वापर करतात, त्‍यांच्‍याशी सामना कठीण आहे. मतांच्‍या दृष्‍टीने जात, धर्माचा वापर करणारे अधिक धोकेदायक असतात. ते सगळ्या जाति-धर्मांत असतात. अख्‍खे दलित नव्‍हे, तर केवळ बौद्ध आपल्‍या बाजूनेच राहावेत यासाठी हिंदू देवदेवतांचा अनावश्‍यक शिव्‍याशाप देऊन उद्धार करणारे, एखाद्या अत्‍याचारावर प्रतिक्रिया देताना 'होऊन जाऊ दे यादवी,' असे बेजबाबदार विधान करणारे बौद्ध नेते व विद्वान अनेक आहेत. सर्वसामान्‍य बौद्धांमध्‍ये आपली मान्‍यता टिकवण्‍याचा भावनिक आवाहने हा राजमार्ग असतो. त्‍यासाठी फारसे कष्‍ट पडत नाहीत. मंदिर, मराठी माणूस, जिहाद...हे असेच वास्‍तवातील ख-या-खोट्याला चलाखीने आपल्‍या शिडात भरण्‍याचे प्रकार आहेत.


'सम्‍यक' याचा अर्थ, आपल्‍या चळवळीचे अंतिम उद्दिष्‍ट व्‍यापक आहे, याची स्‍पष्‍टता असणे. बुद्धाचे 'सब्‍बे सत्‍ता सुखि होन्‍तु'(सर्व प्राणिमात्र सुखि होवोत), प्राचीन भारतीय परंपरेतील 'सर्वेपि सुखिन सन्‍तु' किंवा ज्ञानेश्‍वरांचे 'भूतां परस्‍परे जडो मैत्र जिवाचे' हे पसायदान ही व्‍यापक वैश्विक कल्‍याणाची स्‍वप्‍ने होती. या व्‍यापक ध्‍येयाच्‍या पूर्ततेसाठीच आपले छोटे छोटे झगडे असावे लागतात. एक अलिकडचे उदाहरण देतो. ओबामांच्‍या अध्‍यक्षपदाच्‍या शपथविधीनंतर दुस-याच दिवशी मार्टिन ल्‍यूथर किंगच्‍या मुलाने एक लेख लिहिला. आपले वडिल सारखे तुरुंगात जातात, यावरुन शाळेत या मुलाला इतर मुले चिडवत. म्‍हणून तो आईला एकदा त्‍याचे कारण विचारतो. आईने दिलेले उत्‍तर मोठे मार्मिक आणि उन्‍नत करणारे आहे. ती म्‍हणते- 'तुझे वडिल जग सुंदर करण्‍यासाठी तुरुंगात जातात.' 


काळ्यांना न्‍याय मिळावा, समानतेचा अधिकार मिळावा यासाठी लढणा-या मार्टिन ल्‍यूथर किंग यांचे स्‍वप्‍न केवळ काळ्यांच्‍या न्‍यायापुरते सीमित नाही. हा न्‍याय मिळवायचा आहे तो अखेर 'जग सुंदर करण्‍यासाठी' हे त्‍यांच्‍या मनात स्‍पष्‍ट होते. नेल्‍सन मंडेला 27 वर्षांच्‍या कारावासातून सुटल्‍यानंतर नव्‍या राज्‍यव्‍यवस्‍थेचे सूतोवाच करताना आपल्‍या काही कट्टर कार्यकर्त्यांना त्‍यांनी एक गोष्‍ट निक्षून सांगितल्‍याचे मी त्‍यावेळी वाचले होते. ते म्‍हणाले होते, 'आता गो-यांचे राज्‍य जाऊन काळ्यांचे येणार नाही. आता राज्‍य येणार ते दक्षिण आफ्रिकेतल्‍या जनतेचे.' ही जनता काळी-गोरी दोन्‍ही होती. पुढे राज्‍यकारभार सुरु झाल्‍यावर जुन्‍या गो-या राजवटीतला गृहमंत्री नव्‍या राजवटीतही कोणीतरी मंत्री किंवा अधिकारपदावर होता. या गृहमंत्र्याच्‍या आदेशाखातर अनेक काळे युवक आंदोलनात मारले गेले होते. अनेक काळ्यांना या गृहमंत्र्याबद्दल राग असणे स्‍वाभाविक होते. यावर उपाय म्‍हणून मंडेलांनी या गो-या गृहमंत्र्याला सांगितले, 'ज्‍या आयांची मुले तू मारलीस, त्‍या आयांचे पाय धुवून त्‍यांची माफी माग'. हा उपाय या गृहमंत्र्याने कचरत कचरत पण अखेर पार पाडला. हे सर्व दृश्‍य व मुलाखती दूरदर्शनच्‍या 'हिस्‍ट्री' चॅनेलवर मध्‍यंतरी दाखवल्‍या गेल्‍या. ते वातावरण सद्गदित करणारे होते. तो गृहमंत्री म्‍हणतो, 'प्रथम त्‍या आया कठोर होत्‍या. पण पाय धुतल्‍यानंतर त्‍याही रडल्‍या व मीही रडलो'. 


काळ्या-गो-यांतील जुनाट विद्वेष धुवून टाकण्‍याचे (परमनंटली डिलीट करण्‍याचे) सामर्थ्‍य केवळ अशा अश्रूंतच असू शकते. दूरदर्शनच्‍या त्‍या मुलाखतीत काळा-गोरा द्वेष समूळ नष्‍ट करण्‍याचा हा उपाय सुचवणा-या मंडेलांचे थोर द्रष्‍टेपण तो गोरा मंत्री पुन्‍हा पुन्‍हा भरल्‍या गळ्याने सांगत होता. गो-यांचे वर्चस्‍व नष्‍ट करण्‍याचा मार्ग काळ्यांचे वर्चस्‍व असू शकत नाही. समानता व द्वेषाच्‍या शृंखलेला पश्‍चातापाने, क्षमेने, प्रेमाने विराम देणे हाच असू शकतो. ओबामा हा काळा माणूस अध्‍यक्ष झाल्‍याबद्दल मार्टिन ल्‍यूथर किंगच्‍या मुलाने 'अमेरिकनां'बद्दल अभिमान व्‍यक्‍त केला आहे. ओबामाला मते देणा-या फक्‍त काळ्या किंवा समतावादी गो-यांबद्दल नव्‍हे. ओबामाने आपली काळी मूळे जपत, समानतेच्‍या, न्‍यायाच्‍या लढ्याच्‍या परंपरेचे स्‍मरण ठेवत या व्‍यापक 'अमेरिका'पणाला आवाहन केले. त्‍याच्‍या यशाचे एक महत्‍वाचे गमक ते आहे. भारतातील 'ओबामा' घडवताना जातींची संधिसाधू बेरीज नव्हे, तर व्‍यापक 'भारतीय' अवकाश कवेत घेण्‍याचे सामर्थ्‍य कमवावे लागेल. जाता जाता, 'मी प्रथम व अंतिमतः भारतीय आहे' हे बाबासाहेबांचे उद्गारही लक्षात ठेवूया.


आता मग आपण काय करायचे, पुरोगामी चळवळींनी काय करायचे आणि सम्राटने काय करायचे, हे जरा अधिक स्‍पष्‍ट होईल. सम्राटने दिल खोल के पहिल्‍या पानावर 'कार्तिकीदेवींचा विजय असो!' अशा मोठ्या हेडिंगची बातमी देऊन स्‍वागतपर अग्रलेख लिहायला हवा होता. अग्रलेखाचे शीर्षक हवे होते, 'आता कलेच्‍या प्रस्‍थापित मक्‍तेदारीवर अखेरचे घाव पडत आहेत'. आणि हो, त्‍या अग्रलेखात प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन आणि रोहित राऊत या महाराष्‍ट्राला वेड लावणा-या निरागस निर्झरांचे भरभरून कौतुक हवे होते'. असे करणे काही वेगळे, वहिवाटीला सोडून असे अजिबात नाही. हे म्‍हणजे, 'सम्राट' जे आराध्‍य पूजतो त्‍या बुद्धाच्‍या 'सब्‍बे सत्‍ता सुखि होन्‍तु' आणि ब्राम्‍हण्‍याची खरी व्‍याख्‍या करणा-या बाबासाहेबांच्‍या पावलांवर मार्गक्रमणा करणेच आहे.


प्रगतीशील चळवळींवर, विशेषतः प्रस्‍थापिताला पर्याय उभे करु पाहणा-या सांस्कृतिक चळवळींवर आणखी काही जबाबदारी येते. बहुजनांतली मुले आता आपल्‍या प्रतिभेने चमकणे हे वाढतच राहणार आहे. काळ त्‍यांना पोषकच आहे. पण ही मुले प्रस्‍थापितांच्‍या निकषांचीच वाट चोखाळणार हे ही स्‍वाभाविक आहे. 


अभिजित सावंत आमच्‍या कोकणातला बौद्ध. (मी कोकणातला आहे म्‍हणूनही असेल, पण कोकणातले लोक बाबासाहेबांचे अधिक कट्टर अनुयायी असतात, असे अनेक कोकणी बौद्ध म्‍हणतात, म्‍हणून 'कोकणातला' हा संदर्भ दिला. धर्मांतर झाल्‍या झाल्‍या आमच्‍या आईने महारपणाचे निदर्शक असलेल्‍या कोपरापर्यंतच्‍या चांदीच्‍या वाख्‍या वापरणे सोडले. माझ्या अनेक नातेवाईक स्त्रियांनी गुडघ्‍यापर्यंतचे लुगडे पूर्ण नेसायला सुरुवात केली. मोठ्याचे (बैल किंवा गाईचे) मांस खाणे सोडून दिले. हिंदू देवदेवतांचे फोटो घरांतून काढून टाकले आणि त्‍या जागी बाबासाहेब आणि बुद्धाच्‍या आणि महात्‍मा फुलेंच्‍या प्रतिमा लावल्‍या. असो.) अभिजित सावंतने इंडियन आयडॉल झाल्‍यावर मी कसा गणपतीचा भक्‍त आहे, वगैरे सांगितले. गणपतीच्‍या फोटोला हात जोडतानाही त्‍याला दाखवले गेले. त्‍याने कोठेही बाबासाहेब, बुद्ध यांविषयी आपल्‍या आयुष्‍याला वळण लावणारे म्‍हणून कृतज्ञता व्यक्त केल्‍याचे दिसले नाही. मग त्‍याच्‍या बौद्ध असण्‍याचा आम्‍हाला 'अभिमान' का वाटावा, असा माझ्या काही कोकणी बौद्ध मित्रांना प्रश्‍न पडला होता. 


मला वाटते, आपण हे टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने समजून घ्‍यायला हवे. अभिजित सावंतचे गायकीचे कौशल्‍य वादातीत आहे. 'इंडियन आयडॉल' हा किताब त्‍याने रिझर्वेशन वा सवलतीच्‍या आधारे मिळवला, असेही कोणी म्‍हणू शकत नाही. याबद्दल रास्‍त अभिमान असलाच पाहिजे. तो नव्‍या पिढीतला आहे. या पिढीला अस्‍पृश्‍यतेचा अनुभव नाही, तसाच चळवळींचाही अनुभव नाही. त्‍याच्‍या आधीच्‍या पिढीने आपली प्रगतीशील पंरपरा जाणीवपूर्वक त्‍याच्‍यात मुरवायचा प्रयत्‍न करायला हवा होता. त्‍यात काहीतरी उणे राहिले असावे. मुख्‍य म्‍हणजे सम्‍यक विचार प्रसारणारी आंबेडकरी चळवळ आज बाहेर आहे, असे दिसत नाही. अभिमानाच्‍या गगनभेरींऐवजी अभिनिवेशाचा कर्कश्‍य कल्‍लोळ करण्‍यात ही चळवळ आज मग्‍न आहे. (याला अपवाद आहेत, पण ते किरकोळ. तो प्रवाह झालेला नाही.) अभिजित सावंत अभिमानाने आपण बौद्ध असल्‍याचे सांगत नसेल, तर त्‍यास त्‍याच्‍या कमजोरीपेक्षा आधीच्‍या पिढीचे अकर्तृत्‍व आणि आंबेडकरी चळवळीची अभिनिवेशी दिशाहीनता अधिक जबाबदार आहे. 


ही मुले जी गाणी गातात, त्‍या गाण्‍यांचे विषय, त्‍यांची रचना या आजच्‍या मान्‍यताप्राप्‍त रीतीच्‍याच असणार. विद्रोही परंपरेतील गाणी, रचनांचे या मुलांनी वाहक व्‍हायचे असल्‍यास त्‍यांचे तसे शिक्षण करावे लागेल. ती जबाबदारी आपली, पर्यायी प्रवाहाची मांडणी करणा-या किंवा आपला प्रवाह हाच मुख्‍य प्रवाह असल्‍याचा दावा करणा-या सांस्कृतिक चळवळींनी अशा कार्यशाळा घेऊन ही मुले तयार करण्‍याचे काम करायला हवे. मुले संस्‍कारक्षम असतात. त्‍यांच्‍यावर हे संस्‍कार करणे कठीण नाही. चळवळींकडे तशी दृष्‍टी, योजना, अवधान व सातत्‍य मात्र लागेल.


काहींना असेही वाटते, एसएमएसने निवड किंवा अशी स्‍पर्धा असणे हा बाजारुपणा आहे. काही सर्जक स्‍पर्धांचा अपवाद करता, हे मत योग्‍यही आहे. पण त्‍यापासून फटकून राहण्‍याऐवजी ज्‍या बाजारात आपल्‍याला आजवर प्रवेशच नव्‍हता, तो प्रवेशाचा अधिकार तिथे प्रस्‍थापित करणे, आपल्‍या अस्तित्‍वाची दखल घ्‍यायला लावणे, हे चळवळीचे एक पुढचेच पाऊल आहे. ते टाकत असताना दुसरीकडे असा बाजारुपणा नसलेले, निर्मळ सांस्‍कृतिक संचित उभे करायला आपला कोणीच हात धरलेला नाही. उलट या संचिताचे लेणे ल्‍यायलेली मुले या बाजारात उतरली, तर इतरांना ती दीपस्‍तंभासारखी दिशादिग्‍दर्शक ठरतील. त्‍यांचे प्रमाण वाढले, तर बहुधा 'प्रस्‍थापिता'चीच पुनर्मांडणी होईल. त्‍यातूनच 'मुख्‍य प्रवाह' प्रशस्‍त होईल.


आपले तिथे धडच नव्‍हते, ते 'धड' तिथे आता दिसते आहे. या धडावर आज आपले 'डोके' नाही. ते आपल्‍या मूल्‍यांचे वाहक असलेले डोके कार्यशाळा, शिबिरांनी तयार करुन त्‍या धडावर बसवूया. त्‍याचवेळी हीही खबरदारी घेऊया की, हे डोके संकुचित विशिष्‍ट गटाच्‍या न्‍यायाचाचे रुदन करणारे नसेल; तर त्‍यात 'जग सुंदर करु' पाहणारे 'सम्‍यक' स्‍वप्‍न भरारी घेत असेल.


- सुरेश सावंत


१२ फेब्रुवारी २००९


संपर्कः 9892865937, sureshsawant8@hotmail.com

Wednesday, February 11, 2009

‘अब्राहम लिंकन ते ओबामा’

संदर्भासाठी म्‍हणून हा पत्रकाचा मसुदा इथे ठेवत आहेः


..................................................................................


'अब्राहम लिंकन ते ओबामा'


कुमार केतकर यांचे व्‍याख्‍यान


4 फेब्रुवारी 2009, सायं. 6.30 वा.


स्‍थळः धुरु हॉल, दादर रेल्‍वे स्‍टेशन जवळ, दादर (प)



प्रिय सहकारी,



अमेरिकेच्‍या अध्‍यक्षपदी बराक ओबामांनी विराजमान होणे, हे कुठच्‍यातरी एका देशाचे अध्‍यक्षपद त्‍या देशातील कोणा एका नेत्‍याला मिळणे एवढ्यापुरते सीमित नाही, हे आपण सगळेच जाणतो. गुलामगिरीच्‍या अनन्वित अत्‍याचाराखाली भरडलेल्‍या आणि आजच्‍या प्रगत अमेरिकेतही विषमतेचा भोग पूर्णपणे न संपलेल्‍या कृष्‍णवर्णीयांमधून कोणी एक ओबामा अमेरिकेच्‍या सर्वोच्‍चपदी पोहोचणे ही असामान्‍य घटना आहे. एवढेच नव्‍हे, तर ओबामांची निवडणुकीच्‍या काळातील भाषणे, निवडून आल्‍यानंतरचे आणि आता अध्‍यक्षपद स्‍वीकारानंतरचे भाषण यांमधून आधीच्‍या राजवटीच्‍या धोरणांपासून काही वेगळे, व्‍यापक अधिक आश्‍वासक असे जाहीर होत होते. ही आश्‍वासकता केवळ अमेरिकन काळ्या किंवा उदारमतवादी गो-या जनतेपुरती नव्‍हती. एकूण जागतिक समुदायालाच ते एक उन्‍नत आवाहन होते. बराक ओबामांच्‍या विजयाचा जल्‍लोष, शपथविधीला जमलेला 20 लाखांचा समुदाय, ओबामांच्‍या नावाचा जयघोष, या सगळ्याला प्रतिसाद देणारे ओबामांचे थेट काळीज थरारत नेणारे भाषण, जीव कानांत व डोळ्यांत आणून त्‍यांचे ते शब्‍द अंतरात साठवणारी आणि अश्रूंनी त्‍यांचे शिंपण करणारी तमाम अमेरिकन तसेच जागतिक जनता आपण दूरदर्शनवर सतत पाहत आलो आहोत. खरे म्‍हणजे आपणही त्‍यातलेच होतो. ते सर्व क्षण जगत होतो. आजही आपण त्‍या भारलेपणात आहोत.



या भारलेपणाचा नक्‍की अर्थ काय, गुलामगिरीच्‍या विरोधात लढणारे व ती कायद्याने नष्‍ट करणारे अब्राहम लिंकन, काळ्या-गो-यांच्‍या समानतेच्‍या स्‍वप्‍नासाठी संघर्ष करणारे मार्टिन ल्‍यूथर किंग यांनी नक्‍की काय केले, त्‍यांचे खून का झाले, आणि त्‍यांचा वारसदार म्‍हणून ओबामांना अमेरिकन जनतेने आपला प्रतिनिधी म्‍हणून कसे निवडले, त्‍यांच्‍या निवडीचा एकूण मानवतेशी आणि भारतीय म्‍हणून आपल्‍याशी संबंध काय....हे सर्व समजून घेणे रोमांचक, उद्बोधक तसेच दिशादर्शकही आहे.



यासाठीच 'अ‍ब्राहम लिंकन ते ओबामा' या विषयावर लोकसत्‍ताचे संपादक कुमार केतकर यांचे भाषण बुधवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सायं. 6.30 वा. धुरू हॉल, दादर रेल्‍वे स्‍टेशनजवळ, दादर (प) येथे आयोजित करत आहोत.



आपण स्‍वतः हे भाषण ऐकण्‍यास यावे तसेच आपल्‍या सहकारी-मित्रांनाही निमंत्रित करावे, ही विनंती.


- राष्‍ट्रीय एकता समिती